मुंबईत रीलसाठी सायकलवरून जीवघेणे स्टंट, पोलिसांनी शिकवला धडा

प्रसिद्धीसाठी हपापलेले लोक काहीही करायला तयार होतात. असाच एक तरुण जीव धोक्यात घालून सायकलवरून स्टंट करत होता. याचे व्हिडीओही त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. पण पोलिसांनी या तरुणाला अटक केली असून त्याला चांगलाच धडा शिकवला आहे.

मेहुल चरणिया हा 20 वर्षीय तरुण चेंबुरचा रहिवासी आहे. 4 जून 2024 रोजी पहाटे तीन ते चारच्या सुमारास त्याने मुंबईतल्या फोर्ट भागात सायकल आणि भाड्याच्या टॅक्सीतून काही जीवघेणे स्टंट केले होते. हे स्टंट त्याने मित्रांच्या सहाय्याने रेकॉर्ड केले आणि आपल्या सोशल मीडिया अकांउटवर पोस्ट केले होते. पोलिसांच्या नजरेत हे व्हिडीओ आल्यानंतर त्यांनी मेहुलचा शोध घेतला आणि त्याला अटक केली. मेहुलसोबत जे मित्र होते ते उत्तराखंडचे रहिवासी होते, पोलिस त्यांचाही शोध घेत आहेत.

पोलिसांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. तसेच असे जीवघेणे स्टंट करून व्हिडीओ बनवू नका असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.