जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे रविवारी अमरनाथ यात्रा बालटाल मार्गावर स्थगित करण्यात आली आहे. या मार्गावर तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्यामुळे या मार्गावरील यात्रा स्थगित करण्यात आली आहे.
रविवारी अमरनाथ यात्रेच्या पहलगाम आणि बालटाल या दोन्ही मार्गांवर मुसळधार पाऊस पडला. यामुळे पहलगाम मार्गही देखभालीच्या कामकाजासाठी बंद करण्यात आल्याने दोन्ही मार्गावरील यात्रा स्थगित करण्यात आल्याचे काश्मीरचे विभागीय आयुक्त व्ही के भिदुरी यांनी सांगितले.
दुरुस्ती आणि देखभालीचे काम हाती घेणे आवश्यक आहे. यात्रेकरूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने उद्या बालटाल मार्गावरूनही यात्रेला परवानगी दिली जाणार नाही, असे भिदुरी यांनी पुढे नमूद केले. या वर्षी आतापर्यंत 5.10 लाखांहून अधिक भाविकांनी भगवान शिवाचे दर्शन घेतले आहे.