पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या स्पर्धेची सुरुवात 26 जुलैपासून झाली होती. या भव्य स्पर्धेची सांगता 11 ऑगस्ट रोजी झाली. या स्पर्धेत 10 हजारांहून अधिक खेळाडू सहभागी झाले असून यापैकीच 329 खेळांडूंनी यश संपादन केलं. काहींनी सुवर्ण, रौप्य तर काहींनी कास्य पदकावर आपले नाव कोरले. मात्र जगभरात विशेष ओळख असणाऱ्या या पदाकांबाबत आता एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मिळालेल्या पदकांचा रंग काही दिवसांतच उडत असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अमेरिकन कांस्य पदक विजेता नायजा हस्टन याने सोशल मीडियावर पोस्ट करत पदकाचा रंग उडाल्याचे म्हंटले आहे. ऑलिम्पिक पदक हे नवे कोरे असतानाच चांगले वाटते. पण थोड्या वेळाने आपल्या त्वचेवरील घाम या पदकावर लागल्यानंतर आणि मित्रांकडे काहीवेळ दिल्यानंतर या पदकाचा रुप समोर दिसून येते. हे पदक मिळून केवळ एक आठवडाच झाला आहे. बहुतेक याचा दर्जा वाढवायला हवा, असं नायजा हस्टनने म्हटलं आहे.
View this post on Instagram
नायजा हस्टनसोबत ब्रिटनची कांस्य पदक विजेती यास्मिन हार्परने पदकाचा रंग उडाल्याचे म्हटले आहे. यास्मिनने पुरावा म्हणून तिच्या पदकाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. मात्र अद्यापही पॅरिस ऑलिम्पिक आयोजकांकडून यावर अजून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीय. दरम्यान पॅरिस ऑलिम्पिकच्या रंग उडालेल्या पदकांमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.