प्रभाग क्रमांक 206 शिवडी काळाचौकी येथील रहिवाशांना रेशनकार्डविषयक कामासाठी परळ शिधावाटप कार्यालय येथे जावे लागत होते. मात्र तिथे पुरेसे कर्मचारी नसल्यामुळे त्यासाठी रहिवाशांना अनेक वेळा हेलपाटे मारावे लागत होते. रहिवाशांची ही गैरसोय दूर करण्यासाठी कार्यालयातील रिक्त पदे भरण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली होती. ही मागणी मान्य करत कार्यालयातील दोन रिक्त पदे भरण्यात आली आहेत. त्यामुळे शिवडी-काळाचौकीतील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन पडवळ आणि शाखाप्रमुख हनुमंत हिंदोळे यांनी परळ येथील रेशनिंग कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन रिक्त पदे भरा आणि रहिवाशांची गैरसोय टाळा, असे पत्र दिले होते. या पत्राची दखल घेत 15 दिवसांच्या आत परळ येथील रेशनिंग कार्यारिक्त असलेली कार्यालयीन लिपिक पदाची दोन पदे आता भरण्यात आली आहेत, अशी माहिती माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी दिली.