शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी या घटनांबद्दल अप्रत्यक्षरीत्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्रात आपापसात गोंधळ करण्यासाठी, मराठी माणसांमध्ये मारामाऱ्या लावण्यासाठी दिल्लीतल्या अहमदशहा अब्दालीने तीन नेत्यांना सुपारी दिली आहे, पण काहीही फरक पडत नाही, दोन महिने थांबा, असे संजय राऊत म्हणाले.
ठाण्यात गोंधळ घालणारे अब्दालीचे लोक होते, असे सांगतानाच संजय राऊत म्हणाले की, गोंधळ घालणाऱयांनी काळोखाचा फायदा घेऊन काही फेकले असेल म्हणून वाचले, मर्दाची औलाद असते तर समोर आले असते मग शिवसैनिक आणि महाराष्ट्र काय आहे हे दिसले असते. गोंधळ घालणाऱयांना माझी हात जोडून विनंती आहे की, पुन्हा अशी कृत्ये अंधारात, लपूनछपून करू नका. तुमच्या घरात तुमचे आईवडील वाट पाहत आहेत, तुमची मुलेबाळे वाट पाहत आहेत, पत्नी वाट पाहत आहे.