जगभरातील घडामोडी…

घरच्या घरी तपासा, मोबाईल नेटवर्क स्ट्रेंथ

आजच्या काळात मोबाईल गरजेचा आहे. केवळ का@ल करण्यासाठी नव्हे तर, बँकिंग, पेमेंट, ऑनलाइन शॉपिंग आदींसाठी मोबाईलचा वापर होतो. या कामांसाठी चांगले नेटवर्प गरजेचे असते. मोबाईल नेटवर्क आहे की नाही, हे तपासायचे असेल तर पुठेही बाहेर जायची गरज नाही. घरातल्या घरात बसून नेटवर्पची सिग्नल स्ट्रेंथ, स्पीड आणि लेटेन्सी तपासता येते. मोबाईल नेटवर्कची ताकद म्हणजे सिग्नल स्ट्रेंथ तपासण्यासाठी काही अॅपची मदत घेता येते. ‘ओपनसिग्नल’ असे अॅपचे नाव आहे. ‘ओपनसिग्नल’ अॅपद्वारे तुम्ही नेटवर्पचा स्पीड, नेटवर्प उपलब्ध आहे का, ते तपासू शकता. ‘ओपनसिग्नल’ अॅपच्या ‘ऑल ऑपरेटर’ पर्यायाद्वारे जियो, एअरटेल, बीएसएनएल आणि व्हीआय नेटवर्पची माहिती एकाच वेळी पाहता येईल. स्मार्टपह्नवर ‘ओपनसिग्नल’ अॅप डाऊनलोड करा आणि इन्स्टॉल करा. सिग्नल स्ट्रेंथ तपासायची असेल तर मेन्यूमध्ये जाऊन पिनच्या बाणावर टॅप करा.

पाच किलो बटाटय़ाची मागितली लाच, तीन किलोवर झाली डील! उत्तर प्रदेशातील पोलिसाची ऑडियो क्लिप व्हायरल

उत्तर प्रदेशात कन्नौजमध्ये एका पोलिसाने पाच किलो बटाटय़ाची लाच मागितल्याचे एक अजब प्रकरण घडलंय. पाच किलो बटाटय़ांमुळे पोलीस चौकीच्या प्रमुखाला नोकरी गमवावी लागली. पोलीस ठाण्याचा प्रमुख आणि तक्रारदाराचा एक ऑडिओ व्हायरल झाला आहे. ज्यात दोघांमध्ये एका कामासाठी बटाटय़ांची लाच दिल्याचा उल्लेख होता.

कन्नौज जिह्यातील सौरीख पोलीस ठाणे क्षेत्रातील चपुन्ना पोलीस चौकीचे प्रमुख रामपृपाल सिंह आणि तक्रारदारांचा ऑडिओ व्हायरल होतोय. पाच किलो बटाटे नाही तर केवळ दोन किलो बटाटे देऊ शकतो. त्यानंतर पोलिसाने पाचऐवजी तीन किलो बटाटे देण्यास सांगितले.

काशीविश्वनाथचा कॉरिडॉर बुडाला

उत्तर प्रदेशातील 12 जिह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरस्थिती आहे. वाराणसीतील काशीविश्वनाथच्या का@रिडॉरच्या पायऱयांपर्यंत पाणी पोहोचले. त्यामुळे बाबा विश्वनाथ धामच्या गंगा गेटसह तीन गेटमधून प्रवेश बंद करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले, रस्तेही पाण्याखाली गेल्याने उत्तर प्रदेशातील जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, येथे पुढील 48 तासांसाठी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

उत्तराखंडमध्ये महामार्ग बंद

उत्तराखंडमधील चमोली येथे मुसळधार पावसामुळे अनेक भागात भूस्खलन झाले. त्यामुळे बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला. सध्या तरी या दुर्घटनेत जीवितहानी किंवा पुणी गंभीर जखमी झाल्याचे वृत्त नाही. डोंगर कोसळल्यामुळे कामेडा, नंदप्रयाग आणि छिंका भागात राष्ट्रीय महामार्गही बंद आहे. बचावकार्य आणि मलबा हटवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे तब्बल 135 रस्ते बंद आहेत.

मध्य प्रदेशातील गुना येथे विमान कोसळले

मध्य प्रदेशातील गुना हवाई पट्टीवर टू सीटर विमान कोसळले. आज दुपारी 1च्या सुमारास विमानाने टेस्ट फ्लाइटसाठी उड्डाण केले. सुमारे 40 मिनिटे उड्डाण केल्यानंतर विमान कोसळले. इंजिनमध्ये बिघाड झाल्याने हा अपघात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेत पॅप्टन व्ही. चंद्र ठापूर आणि पायलट नागेश पुमार जखमी झाले. अपघातग्रस्त विमान कर्नाटकच्या बेळगाव एव्हीएशन ट्रेनिंग इन्स्टीटय़ुटचे आहे.

आगीच्या अफवेमुळे रेल्वेत चेंगराचेंगरी

पंजाब मेल एक्स्प्रेसला आग लागल्याची अफवा पसरल्यानंतर प्रवाशांनी चक्क चालत्या रेल्वेतून उडय़ा मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यावेळी चेंगराचेंगरीही झाली. या घटनेत 20 हून अधिक प्रवासी जखमी झाले असून 7 प्रवाशांची प्रपृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. जखमी प्रवाशांना शाहजहांपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेबाबत कळताच रेल्वे प्रशासनाने एक्स्प्रेस गाडी थांबवून तपासणी केली असता सर्व काही ठीक असल्याचे दिसून आले.