अबब! पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या महिलेला 20 लाखांच वीज बिल

पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या एका महिलेला चक्क 20 लाखांच वीज बिल मिळाले आहे. दोन महिन्यातून दोन ते अडीच हजार बील येत असताना अचानक 20 लाखांच वीज बिल आल्यामुळे कुटुंबियांना चांगलाच धक्का बसला आहे.

गुजरातमधील नवसारीमध्ये वीज वितरण विभागाचा भोंगळ कारभार उजेडात आला आहे. नवसारी जिल्ह्यातील बिलीमोरा शहरामध्ये पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या एका महिलेला 20 लाख रुपयांचे वीज बिल पाठवण्याचा कारनामा वीज वितरण विभागाने केला आहे. पंक्तीबेन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरामध्ये चार पंखे, टीव्ही आणि फ्रीज चालू असतो. तसेच घरातील तीन व्यक्ती कामावर राहतात. असे असताना 20 लाख रुपये बिल आल्यामुळे कुटुंबीयांना धक्का बसला आहे. दर दोन महिन्यांनी दोन ते दीड हजार बिल येतो. मात्र दक्षिण गुजरात पॉवर कंपनीच्या मीटर रिडींग करणाऱ्या कर्मचाऱ्याने जून-जुलैचे वीज बिल 20 लाख एक हजार, 902 रुपये इतके अवाढव्य दिले होते. कुटुंबियांनी तक्रार केल्यानंतर गुजरात विद्यूत बोर्डच्या अधिकाऱ्यांना त्यांची चुक लक्षात आली. त्यानंतर मीटर रीडरची चूक सुधारून नवीन बिल देण्यात आले.