हिंदुस्थानची स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने 50 किलो वजनी गटात फायलनमध्ये प्रवेश केल्यामुळे हिंदुस्थानला Paris Olympics 2024 मध्ये पहिले सुवर्ण पदक मिळण्याच्या आशा निर्माण झाल्या होत्या. मात्र 100 ग्रॅम वजन वाढल्यामुळे विनेशला अपात्र ठरवण्यात आले. त्यानंतर विनेशने रौप्य पदक मिळावे यासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे (CAA) याचिक दाखल केली होती. आज (11 ऑगस्ट) CAA विनेश संदर्भात निर्णय जाहीर करणार आहे. परंतु या सर्व घडामोडींमध्ये विनेश सारख्याच एका प्रकरणाचा निकाल आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाने जाहीर केला. त्यामुळे पराभूत झालेल्या रोमानियाच्या जिन्मॅस्टला आता कांस्य पदक मिळणार आहे.
जिन्मॅस्टच्या फ्लोर इव्हेंटमध्ये रोमानियाची जन्मॅस्ट अॅना बारबोसू ही अमेरिकेच्या जॉर्डन चाइल्सलाविरुद्ध पराभूत झाली होती. अंतिम फेरीत जॉर्डनने 13.776 गुणांची कमाई करत तिसरे स्थान पटकावले, तर अॅनाला 13.700 गुणांसह चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यामुळे जॉर्डन चाइल्सला कांस्य पदक देण्यात आले होते. तर चौथ्या क्रमांकावर राहिल्यामुळे अॅना बारबोसू पदकापासून वंचित राहिली. मात्र जॉर्डनने चुकीच्या पद्धतीने गुण मिळवले, असा दावा अॅनाने केला होता. याप्रकरणी आंतरराष्ट्रीय क्राडी लवादासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणीमध्ये रोमानियाची जिन्मॅस्ट अॅना हिने जॉर्डनने चुकीच्या पद्धतीने गुण मिळवल्याचे सिद्ध केले. त्यामुळे क्रीडा लवादाने अॅनाच्या बाजूने निकाल देत तिला कांस्य पदक देण्याचे जाहीर केले आहे.