फिक्सिंगची किड लागली! ‘या’ खेळाडूवर ICC ने घातली पाच वर्षांची बंदी, आणखी तीन खेळाडू रडारवर

फिक्सिंगमुळे मोठमोठे क्रिकेटपटू गोत्यात आल्याची अनेक प्रकरणे उजेडात आली आहेत. काही खेळाडूंची पूर्ण कारकीर्द फिक्सिंगमुळे संपूष्टात आली. आता ही फिक्सिंगची किड अफगाणिस्तान क्रिकेटमध्ये शिरल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे ICC ने कडक कारवाई करत अफगाणिस्तानच्या सलामीवीरावर 5 वर्षांसाठी बंदी घातली आहे.

अफगाणिस्तानकडून कसोटी, वनडे आणि टी-20 या तीन्ही फॉरमेटमध्ये देशाचे प्रतिनिधीत्व करणारा आणि वयाच्या 19 व्या वर्षी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा अफगाणिस्तानच्या सलामीवीरा अडचणीत आला आहे. आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, इहसानुल्लाह जानत हा काबुल प्रीमियर लीगच्या दुसऱ्या हंगामात भ्रष्टाचार विरोधी संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळला होता. इहसानुल्लाह जानत व्यतिरिक्त अफगाणिस्तानचे अन्य तीन खेळाडू सुद्धा आयसीसीच्या रडारवर आहेत. त्यांची सध्या चौकशी सुरू असून आयसीसीने त्यांची नावे अद्याप जाहीर केली नाहीत.

इहसानुल्लाह जानत याने 24 फेब्रुवारी 2007 रोजी न्युझीलंडविरुद्ध टी-20 सामन्यात आंतरराष्ट्रीय करिअरला सुरुवात केली होती. त्याने अफगाणिस्तानकडून 16 वनडे, 3 कसोटी आणि 1 टी-20 सामना  खेळला आहे.