दोनशे कोटीच्य़ा मनी लॉण्ड्रींग प्रकरणातील आरोपी आणि बॉलीवूड कलाकारांची फसवणूक करणारा महाठग सुकेश चंद्रशेखर याने तुरुंगात जॅकलीन फर्नांडिसला खूप मिस केले. त्याने तुरुंगातून जॅकलीनला अनेकदा पत्रं लिहून प्रेम व्यक्त केले आहे. आता त्याने चक्क जॅकलीनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पत्र लिहीत तिला खास भेट दिली आहे.
आज बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हिचा वाढदिवस असून ती 39 वर्षांची झाली आहे. काही दिवसांपूर्वी सुकेशने तिला वचन दिले होते की, लेडी जॅकलीन नावाने तो तिला एक खासगी बोट भेट म्हणून देणार. दिल्लीच्या मंडोली तुरुंगातून सुकेशने जॅकलीनसाठी एक नवे प्रेमपत्र पाठवले आहे. ज्यामध्ये त्याने तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. सकेशने पत्रात लिहीले की, ”लव्ह यू माय जान, बेबी मी कायम म्हणतो की लोकं दरवर्षी मोठे होतात, मात्र तू दरवर्षी तरुण होत आहेस, दरवर्षीपासून आधीपेक्षा सुंदर दिसत आहेस. बेबी, हे वर्षातले माझे सगळ्यात आवडते सेलिब्रेशन असते. मी तुझ्यासोबत हा क्षण साजरा करण्याची वाट पाहतोय. आपण हा दिवस आणखी एक वर्ष एकत्र साजरे न करता घालवू, जरी आम्ही एकमेकांपासून कितीही दूर असलो तरीही आमचे विचार आणि आमचे आत्मे एकमेकांशी जोडलेले आहेत.”
सामाजिक कार्यात स्वारस्य असलेल्या जॅकलिनसाठी सुकेशने वायनाड पीडितांना 15 कोटी रुपयांची मदत केली आहे. सुकेशने असेही सांगितले आहे की, त्याने तेच जहाज जॅकलिनला दिले आहे, जे त्याने 2021 मध्ये फायनल केले होते. सुकेशने लिहिले, “तुझ्यासोबत जहाजावर जाण्यासाठी मी आतुरतेने वाट पाहत आहे. तसेच मी वचन देतो की ते माझ्यापासून कोणीही हिरावून घेणार नाही कारण हे सर्व कर भरलेले आणि पूर्णपणे कायदेशीर आहे.”
जॅकलिन फर्नांडिस हिच्या वाढदिवसानिमित्त यिम्मी यिम्मी हे नवीन गाणे ऐकणाऱ्याला थेट आयफोन 15 प्रो बक्षीस म्हणून दिला जाईल, असे म्हटले होते आणि त्याप्रमाणे त्याने 100 चाहत्यांना ते फोन भेट दिले,