महिलेचा भाऊ मुलीसोबत गेला पळून, मुलीच्या नातेवाईकांकडून महिलेवर सामूहिक बलात्कार

एक तरुण आणि तरुणीने पळून जाऊन लग्न केले. याचा राग मनात धरुन तरुणीच्या नातेवाईकांनी तरुणाच्या बहिणीवर सामूहिक बलात्कार केला आहे. पंजाबमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रविदंर सिंहच्या मुलीचे एका तरुणावर प्रेम जडले. दोघांना लग्न करायचे होते पण मुलीच्या कुटुंबीयांकडून या लग्नाला विरोध होता. म्हणून हे जोडपं पळून गेले आणि त्यांनी लग्न केलं. त्यानंतर रविंदर सिंह 31 मे ला उत्तर प्रदेशहून लुधियानाला महिलेच्या घरी आला. ही महिला आणि मुलीसोबत पळून गेलेला तरुण बहीण भाऊ होते. रविंदर सिंह आणखी तिघांसोबत या महिलेच्या घरी आणि तिच्या भावाची चौकशी करू लागला. पण तो कुठे गेला हे या महिलेला माहित नव्हते.

त्यामुळे रविंदर सिंह आणि त्याच्या साथीदारांनी बदला घेण्यासाठी या महिलेवर सामूहिक बलात्कार केला. इतकंच नाही तर त्याचे व्हिडिओही काढले. या बाबत पोलिसांना तक्रार केली तर हे व्हिडीओ व्हायरल करू अशी धमकी आरोपी रविंदर सिंहने महिलेला दिली.

या घटनेमुळे महिलेला जोरदार मानसिक धक्का बसला. अनेक दिवस झाले तरी या धक्क्यातून बाहेर आली नाही. अखेर कशी तरी हिंम्मत करत पीडित महिनेले पोलिस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली असून उत्तर प्रदेशमध्ये आरोपीला शोधायला सुरूवात केली आहे.