Bhandara crime news – ‘बँक ऑफ इंडिया’चं ATM फोडण्याचा प्रयत्न फसला; चोर सीसीटीव्हीत कैद

भंडारा जिल्ह्यातीर सिरोहा पोलीस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या तुमसर-बेरा राष्ट्रीय महामार्गावरील ‘बँक ऑफ इंडिया’ शाखेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्याने केला. मात्र मशीन तुटल्याने हा प्रयत्न फसला. रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या प्रकरणी बँक ऑफ इंडियाच्या शाखा व्यवस्थापकांनी पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तुमसर-बपेरा या वर्दळीच्या राष्ट्रीय महामार्गावर ‘बँक ऑफ इंडिया’ शाळेचे एटीएम आहे. अज्ञात चोरट्याने एटीएम मशीनचे समोरील बाजूस असणाऱ्या लॉकरचे लोखंडी झाकण उघडले. मात्र एटीएम मशीनमधून रोख रक्कम बाहेर येण्यासाठी असलेला रोलर तोडून मशीनमधून रक्कम काढण्याचा चोराचा प्रयत्न फसला.

मशीन पूर्णपणे न फुटल्याने आणि नागरिकांनाही याची चाहून लागल्याने चोरट्याने तिथून काढता पाय घेतला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून सिहोरा ठाण्याचे ठाणेदार नितीन मदणकर यांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी सुरू केली आहे. पोलीस तपास सुरू असून आरोपी चोराला लवकरच पकडले जाईल असे आश्वासन पोलिसांनी दिले.