”छत्रपती शिवाजी महाराजांनंतरसुद्धा औरंगजेब महाराष्ट्रावर जेव्हा चालून आला तेव्हा त्याच्या सैन्यांच्या घोड्यांना पाणी पिताना देखील पाण्यात संताजी धनाजी दिसायचे. तसेच या अब्दालीच्या खेचरांना पाण्यात उद्धव ठाकरे दिसतात. पण तुम्ही अजून महाराष्ट्राचं पाणी जोखलेलं नाही. महाराष्ट्राने अजून तुम्हाला पूर्ण पाणी पाजलेलं नाही. हा सामना होऊ द्या मग त्यांना महाराष्ट्राचं पाणी काय असतं ते शिवसेना दाखवून देईल, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ठाण्यातील भगवा सप्ताहाच्या समारोपाचा मेळावा गडकरी रंगायतन येथे पार पडला. या मेळाव्यात भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी मिंधे व भाजपची सालटी काढली.
”मिंधे सरकार घोषणांचा पाऊस करतंय अंमलबजावणीचा दुष्काळ, आपल्याला नुसत्या घोषणा करून नाही चालणार. संजय राऊत यांनी मगाशी मिंध्यांना नागाची उपमा दिली. पण हे नाग नाही हे मांडूळ आहेत. दुतोंड्या मांडूळ. ज्याला फणा नाही. हे सरपटणारे प्राणी आहेत. हे मोदींसमोर वळवळणारे मांडूळ आहेत, हे दररोज दिल्लीसमोर सरपटतायत. रोज आपलं यांचं घालीन लोटांगण. यांची पँट तिकडे जाऊन खराब होत नाही. फोन आल्यावरच इथेच खराब होते. तिथून आदेश येतात की जसे असाल तसे या. नशीब पँट घातलेली असते”, असा जोरदार टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.
”हे ठाणे जे उभं राहिलंय ते ठाणेकरांचं शिवसेनाप्रमुखांवरचं प्रेम, शिवसेनाप्रमुखांचं ठाण्यावरचं प्रेम आणि ठाणेकरांची, शिवसैनिकांची अपार मेहनत यामुळे. ही मेहनत झाली नसती. तर मिंधेंची दाढी उगवलीच नसती. हे लबाडी करून जिंकलेले आहेत. आज मी ठाणेकरांचं कौतुक करायला आलो आहे. लबाडी करून, जोरजबरदस्ती, पैशांचा वाटप करूनही सव्वा पाच लाख ठाणेकर आपल्यासोबत निष्ठेने उभे राहिले. वैशाली ताई सारख्या माझ्या कार्यकर्त्या महिलेचा पराभव करायला विश्वगुरुंना आणायला लागलं. हा आपला विजय आहे. सव्वा चार साडे चार मतं कल्याणकरांनी दिली. आपल्याला लांडी लबाडी करून काही नकोय. जे काही आहे हक्काचं प्रेमाचं पाहिजे. भाज्या विकत घेता येतात. आम्हाला मतं विकत नकोयत. प्रचंड पैसा ओतून सुद्धा एवढी मतं मिळवली. तरी सुद्धा लांड्या लबाडी करून आमची गोरेगावची सीट चोरली. अमोल किर्तीकरांचा 48 मतांनी पराभव झाला. 48 मतांनी मुंबईत शिवसेनेचा पराभव होऊ शकतो का? त्यानंतर पदवीधर- शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूका झाल्या. आजपर्यंत कधीच एवढं मतदान झालं नाही तेवढं यंदा पदवीधरच्या मतदारसंघात झालं. प्रचंड मतदाधिक्याने आपला शिवसेनेचा भगवा हाती घेतलेला उमेदवार लोकांनी निवडून दिला. शिक्षक देखील प्रथम आपण निवडून दिला. कोकणात आपला पराभव नाही होऊ शकत. हे सगळे यांचे जे चाळे सुरू आहेत ते अब्दालीचे चाळे आहेत त्यामुळे हे झाले. सगळ्या गुजरातींवर माझा राग नाही. पण जे माझ्या महाराष्ट्राला लुटतायत त्यांना कोणत्याही परिस्थितीत गाडायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर सुद्धा जो औऱंगजेब महाराष्ट्रावर चालून आला. त्यांच्या सैन्यांच्या घोड्यांना पाणी पिताना देखील पाण्यात संताजी धनाजी दिसायचे. तसे या अब्दालीच्या खेचरांना पाण्यात उद्धव ठाकरे दिसतात. पण तुम्ही अजून महाराष्ट्राचं पाणी जोखलेलं नाही. महाराष्ट्राने अजून तुम्हाला पूर्ण पाणी पाजलेलं नाही. हा सामना होऊ द्या महाराष्ट्राचं पाणी काय असतं ते शिवसेना दाखवून देईल, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी मिंधे भाजपला दिला.
”आता काय़ योजना आणली आहे. लाडकी बहिण योजना 1500 रुपये देण्याची. अहो 15 लाख देणार होतात तुम्ही त्याचे 1500 कसे झाले. बाहेरून काळा पैसा आणून त्यातून प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख देणार होते. मग त्या 15 लाखांचे 1500 कसे झाले. वरचे शून्य कुण्याच्या खिशात गेले. मिंध्यांच्या खिश्यात गेले काय? जाऊ तिथे खाऊ हा यांचा घंदा आहे. यांनी आता क्लस्टर योजना आणली आहे. योजना चांगली आहे. तिथल्या लोकांना घरं मिळाली पाहिजे. महाप्रीत अशी सरकारची कंपनी आहे यात. यांची महाप्रीत लाडक्या कॉन्ट्रॅक्टरवर आहे. प्रेम कॉन्ट्रॅक्टरवर आहे. हेच यांचे धंदे अनेक वर्ष सुरू आहेत. जे हे कॉन्ट्रॅक्टर ठरवणार त्यांनीच टेंडर भरायचं. महापालिकेत जाऊन बघा. दुसर्या कॉन्ट्रॅक्टरला दारात देखील उभं करत नाहीत. ठाणे महापालिकेला कर्जाचे डोहाळे लागले आहेत. कुणी केले कर्जबाजारी. कुठे गेले पैसे. संपूर्ण जिल्ह्यात रस्त्यांवर खड़्डे आहेत. सगळीकडे खड्डे पाडून वर आमच्यावर बोटं दाखवतायत. तीन महिने थांबा. तुमचा मित्रपरिवार उघडा केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी मिंध्यांना दिला आहे.
”लोकसभेची निवडणूक देशाच्या लोकशाहीची गळा घोटणारी निवडणूक होती. पण या निवडणूकीनंतर आता ते मनमानी नाही करू शकत. पण आता विधानसभेतली ही लढाई महाराष्ट्र द्वेष्ठ्यांसोबत होणार आहे. जे माझ्या महाराष्ट्राला भिकेला लावू पाहत आहेत. त्यांच्या विरोधातली ही लढाई आहे. मराठी माणूस ताठ मानेने उभा असतो. त्याच्या हातात भिकेचा कटोरा देऊन आणि मोदींसमोर लोटांगण घालायला लावायचंय. हे बाळासाहेबांनी आम्हाला शिवकलं नाही. महाराष्ट्राची वाताहत झाली तरी चालेल पण दिल्लीसमोर लोटांगण घाल हे बाळासाहेबांचे विचार नाही. हे ज्यांचे विचार आहेत त्या तोतयांची वळवळ या निवडणूकीत पूर्ण थांबवावी लागेल, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे.
” हल्ली जे काही येतंय ते सगळं गुजरातला जातंय. आणखी एक मोठा प्रकल्प गुजरातला गेलाय. आम्हाला तुम्ही भीक देताय. 1500 रुपयांची भीक देताय. शेतकरी देखील त्याच्या हक्काचा मागतोय. आमचे हक्क मारून टाकायचे. स्वाभिमान मारून टाकायचा व कोपऱ्याला गूळ लावायचा. मिंधे बोलले होते काळजी करू नका. मोदी बोलेले आहेत यापेक्षा मोठा प्रकल्प तुम्हाला देतो. अजून कोणताही प्रकल्प आलेला नाही. अजूनही शेतकरी आत्महत्या करतोय. बेकारांचे लोंढे फिरत आहेत. लाडकी बहिण योजना काढली आहे. एक शेतकरी महिला म्हणाली. 1500 मध्ये घर चालतंय का? मुलाची फी भरली जातेय का? वह्या पुस्तकं देखील येत नाही. व्हया पुस्तकांवर जीएसटी, शिक्षणावर जीएसटी, आयुर्विमावर जीएसटी. जिंदगी के साथ भी. जिंदगी के बाद भी जीएसटी. मेल्यानंतर कशासाठी भरायचा. कुणाच्या खिशात जाणार तो. अगदी वरपासून खालपर्यंत बरबटलेलं सरकार आहे हे. ठाण्यातले भूखंड मुंबईतले भूखंड खातायत. अयोध्येतही सैन्य दलाची जमिन खाल्ली. आमच्या हातता घंटा दिली आणि अयोध्येतली जमिन बिल्डरला दिली. लोढा आता तिथे टॉवर बांधणार. याच्यासाठी यांना राममंदिर हवं होतं. याच्यासाठी तुम्ही आम्हाला लढवलं. याच्यासाठी कारसेवकांचे बळी दिले. लोढाला टॉवर बांधायला कार सेवकांनी रक्त नाही सांडवलं. तुम्ही एक गारूड टाकलं होतं. मंदिर वही बनायेंगे. वाजत गाजत जो एक शो केला. तुम्हाला वाटलं होतं की आता आमच्यासमोर उभंच राहू शकत नाही. पण प्रभू श्रीरामांनी बरोबर बाण मारला आहे. तो आता बरोबर वर्मी लागला आहे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
”शंकराचार्य घरी आले होते. त्यांनी हिंदुत्वाचा अर्थ सांगितचला. जो विश्वासघात करतो तो कधी हिंदू असू शकत नाही. हिंदू कधी विश्वास घात नाही करू शकत. त्यांनी विचारलं केदारनाथ मंदिरातलं 200 250 किलो सोनं गेलं कुठे? तुम्ही आमच्या मंदिरातलं सोनं सोडत नाही. मंदिराची जागा सोडत नाही. वाराणसीत अनेक मंदिरं पाडली. अनेक पुराणकालीन मुर्त्या कापल्या यांनी. हे तुमचं हिंदुत्व. तुम्ही आमच्या अंगावर येता. भ्रष्टाराचाने बरबटलेले आहात तुम्ही. अयोध्येतली जमिन लोढा, रामदेव बाबा खातोय. मला एका गोष्टाीचा अभिमान आहे की मी म्हणालेलो की मला भाजपमुक्त राम पाहिजे. तो अयोध्येतील लोकांनी करून दाखवलं. अयोध्येतील लोकांनी दाखवलं की जो नाही कामाचा तो नाही रामाचा. यांची सगळी पापं काढायला गेलो तर इतके दिवस लागतील की ते कमी पडतील. यांची पापं काही दिवसात उघडी करावीच लागतील, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
” कोरोना काळात आपण जे काम केलं त्याबाबत अजुनही लोकं बोलत आहेत. पण ते श्रेय माझ्या एकट्याचं नाही. मी जे काही सांगत होतो ते तुम्ही करत गेलात. त्यामुळेच गंगेत जशी प्रेतं वाहिली तसं आपण होऊ दिलं नाही. कुणाला उपचाराशिवाय राहू दिलं नाही. हे आपलं काम लोकांपर्यंत पोहचवा. आपली कामं लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. 2012 साली शिवसेनाप्रमुख होते तेव्हा महापालिकेच्या निवडणूका होत्या. माझ्याकडे गोपीनाथ मुंडे आले. त्यांनी विचारलं कसं करायचं. कठिण आहे सगळं. त्यावेळी माझ्या एका मित्राने मला एक कॅम्पेन दाखवलं. त्यानंतर आपण जी जी काम केली तिचे फोटो होर्डींगवर लावले व खाली फक्त लिहलं की करून दाखवलं. त्याची चर्चा झाली. 2012 ची महापालिका आपण जिकंली ती कामाच्या जोरावर जिंकली. हातात तलवार आहे. तलवार पेलायला मनगट पाहिजे. तलवारीपेक्षा मनात जिदद पाहिजे. हातात तलवार असून मनात जिद्द नसेल तर लढणार कसे. या लढाईत एकाच ध्येयाने लढायचं की एकतर तु राहशील नाहीतर मी राहील. तू म्हणजे महाराष्ट्राला लुटायला आलेला तू, तू म्हणजे त्यांच्या पाया जवळ रेंगाळणारा मांडूळ. मांडूळ हा आमच्याकडे नाही. आम्ही जे काही करते तो खुलेआम करतो. चालून जायचं तर समोरासमोर, पाठिवर वार करणारे आम्ही नाही . हे सगळं विधानसभा निवडणूकीत करायचं आहे.
”लाडकी बहिण योजना यांनी आणली तशीच योजना सुशील कुमार शिंदे यांनी आणली होती. त्यावेळी बाळासाहेबांनी एका सभेत घोषणा केली होती की शिवसेनेची सत्ता आली तर कृषीपंपांचं बिल माफ करून टाकेन. त्यांनंतर सुशील कुमार शिंदे यांनी ताबोडतोब शून्य रकमेचं बिल पाठवायला सुरुवात केली. लोकांच्या तेच लक्षात राहिलं. त्यानंतर काँग्रेस सत्तेवर आली. पण विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाल्यावर पुन्हा बिलं येऊ लागलं, ही फसवा फसली करायला आम्ही आलेलो नाही. त्यामुळे त्यांना सांगा आम्हाला तुमची भीक नको. हे अब्दाली आपला महाराष्ट्र लुबाडायला येतायत. सगळे उद्योगदधंदे गुजराला नेतायत. 1500 रुपयांवर महाराष्ट्र विकणार आहोत का? योजनेचा लाभ जरूर घ्या. हे तुमचेच पैसे आहेत. आता तर आणखीन करतायत. मोदींनी केलं होतं. रथ पाठवले होते. गावकऱ्यांनी ते परत पाठवले होते. मोदी सरकार हटवायला लाया योजनासाठी करोडो रुपये उधळतायत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
आपल्या भगव्यावर कोणतंही चिन्ह नको. आपला भगवा भगवाच असला पाहिजे. त्यावर चिन्ह नको. शिवाजी महाराजांनी कुठे त्यावर चिन्ह टाकलं होतं. भगवा एकच. तो बाळासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे. त्यामुळे आतापासून मशालीचा प्रचार करा. प्रत्येकाच्या हृदयात स्वाभिमानाची मशाल पेटवा. लोकशाही गाडणाऱ्या लोकांच्या बुडाला आग लावणारी आपली ‘मशाल’ आहे. चोर ‘धनुष्यबाण’ घेऊन समोर आला आहे, मशालीची धग काय असते आता त्याला दाखवायचीय!, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले.