बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि विरोधी पक्षनते तेजस्वी यादव या काका-पुतण्यांमधील वाद जगजाहीर आहे. नुकतीच राष्ट्रीय जनता दलाच्या अल्पसंख्याक सेलची बैठक पार पडली. या बैठकीत विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार आणि NDA सरकारचा जोरदार समाचार घेतला. तसेच नितीश कुमार यांनी मतदारांचा विश्वासघात केल्याचा आरोप तेसस्वी यादव यांनी केला.
राष्ट्रीय जनता दलाच्या अल्पसंख्यांक सेलच्या बैठकीमध्ये विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर सडकून टीका केली. तेजस्वी यादव म्हणाले की, “बिहारमधून भाजपला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी आम्ही त्यांना दुसरी संधी दिली, मात्र त्यांनी पुन्हा एकदा धोका दिला आणि भाजपशी हातमिळवणी केली. मागील पंधरा वर्षांच्या RJD शासनामध्ये भाजप आणि आरएसएस या संघटनांचा आकारा छोटा होता. परंतु बिहारमध्ये नितीश कुमार यांची सत्ता आल्यानंतर या दोन्ही संघटनांची चांगलीच भरभराट झाली आहे.” असा दावा तेजस्वी यादव यांनी केला आहे. तसेच नोकर भरतीबद्दल असणारी शासनाची उदासीनता, धोरणांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना खलिस्तानी आणि मुसलमानांना आतंकवादी ठरवण्यात आले आणि अल्पसंख्याकांना टार्गेट करण्यात आले. अशा विविध मुद्यांवरून तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर तोफ डागली.