शिक्षण हे सर्वांगीण सुधारणेचे प्रवेशद्वार आहे. काळानुसार शिक्षणात बदल झाला पाहिजे. आपल्या कार्यकर्तृत्वाने शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल घडवून आणणाऱया शिक्षणात नवनवीन प्रयोग करून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडवणाऱ्या अद्भुत महिला शिक्षकांचा परिचय प्रस्तुत पुस्तकात करून देण्यात आला आहे. नावीन्यपूर्ण शिक्षण पद्धतीचा वापर करून विद्यार्थी घडविणाऱ्या या महिला शिक्षकांचा हा प्रवास विलोभनीय आणि विस्मयचकित करणारा आहे. शिक्षणक्षेत्रात या पुस्तकाचे महत्त्व दीपस्तंभासारखे आहे. प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक, तसेच सामान्य वाचकांच्या दृष्टीने हे पुस्तक मार्गदर्शक ठरते. शिक्षण हे सतत प्रवाही असते म्हणून शिक्षकांना स्वतला नेहमी `अपडेट’ ठेवले पाहिजे. लहान मुलांच्या जीवनात शिक्षकाची भूमिका फार महत्त्वाची असते. प्रस्तुत पुस्तकात आपल्याला भेटणाऱ्या आदर्श शिक्षिका ठरल्या. दृष्टिहीन जगाला दृष्टी देणाऱया अॅनी सुलीवॉन मेसीने हेलन केलर आणि तिच्यासारख्या असंख्य मुलांशी संवाद साधण्याचे आवाक्याबाहेरचे कार्य यशस्वीरित्या करून शिकविण्याचा एक नवीन मंत्र सांगितला.
मुलांच्या शिक्षणासाठी लढा देणाऱया, प्रत्येक विद्यार्थ्याची जाणीवपूर्वक दखल घेणाऱया, अशा नावीन्यपूर्ण शिक्षण पद्धतीचा वापर करून विद्यार्थी घडविणाऱया या महिला शिक्षिकांचा हा प्रवास विलोभनीय आणि विस्मयचकित करणारा आहे.
विश्वातील 10 आदर्श शिक्षिका
लेखक : हेलन वोल्फ
अनुवाद : स्वाती काळे
प्रकाशक : साकेत प्रकाशन, छत्रपती संभाजीनगर
पृष्ठसंख्या : 112 किंमत : 150 रुपये