दोन तरुणी मोटरमनच्या केबिनमध्ये घुसले आणि इन्स्टा रील बनवला. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी या दोघांना शोधून काढले आणि आणि त्यांना अटक केली.
कसारा स्टेशनवर 95410 ही लोकल उभी होती. तेव्हा नाशिकमध्ये राहणारे राजा येरवळ आणि रितेश जाधव हे मोटरमनच्या केबिनमध्ये शिरले. त्यांनी व्हिडीओ शुट केला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांच्या ही बाब लक्षात आली. रेल्वे पोलिसांनी तातडीने याचा तपास सुरू केला. पोलिसांनी या दोघांवर कारवाई करून अटक केली. रेल्वे सुरक्षिततेबाबतीत कुठलीच हयगय सहन केली जाणार नाही असे पोलिसांनी म्हटले आहे.
View this post on Instagram