पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी पात्र ठरलेल्या एकमेव पुरुष कुस्तीपटूने हिंदुस्थानला पदक जिंकून दिले. अमन सेहरावत या 21 वर्षीय कुस्तीपटूने 57 किलो वजनी गटात पोर्तोरिकाच्या डार्लिन तुई क्रुझचा पराभव करत हिंदुस्थानच्या झोळीत कांस्यपदक टाकले. यामुळे हिंदुस्थानने यंदा ऑलिम्पिकमध्ये पदकांचा ‘षटकार’ ठोकला. विनेश फोगाट ही वाढलेल्या वजनामुळे फायनलआधी अपात्र ठरली नसती तर आणखी एक पदक हिंदुस्थानला मिळाले असते. मात्र विनेशच्या या प्रकरणातूनच धडा घेऊन अमन सेहरावत याने कांस्यपदकासाठीच्या लढतीची तयारी केली आणि पदकावर मोहोर उमटवली.
सेमीफायनलमध्ये जपानच्या अनुभवी आणि ऑलिम्पिपक पदकविजेत्या खेळाडूने अमन सेहरावत याचा पराभव केला. त्यामुळे त्याचे फायनल गाठण्याचे स्वप्न भंगले. मात्र कुस्तीतील नियमाप्रमाणे त्याला कांस्यपदकाची लढत खेळण्याची संधी मिळाली. या लढतीत त्याने पोर्तोरिकाच्या डार्लिन तुई क्रुझ 13-5 असा धुव्वा उडवत कांस्यपदक जिंकले. अमनच्या आक्रमक खेळापुढे डार्लिन तुई क्रुझ याची दाणादाण उडाली.
AMAN SEHRAWAT – Remember the name! 🤼
Catch all the Olympics action LIVE on #Sports18 & stream FREE on #JioCinema.#OlympicsOnJioCinema #OlympicsOnSports18 #JioCinemaSports #Olympics #Paris2024 #Wrestling pic.twitter.com/V8vUfA3qRv
— JioCinema (@JioCinema) August 9, 2024
10 तासात 4.5 किलो वजन केलं कमी
सेमीफायनलमध्ये पराभव झाल्यानंतर अमनला कांस्यपदकाची लढत खेळायची होती. तत्पूर्वी त्याचे वजन करण्यात आले. ते 4.5 किलो जास्त भरले. अमन 57 किलो वजनी गटामध्ये खेळतो आणि त्याचे वजन 61.5 किलो झाले होते. त्यामुळे कांस्यपदकाच्या लढतीपूर्वी त्याला वजन कमी करणे आवश्यक होते. यासाठी त्याच्या हातात फक्त 10 तास शिल्लक होते. या दरम्यान त्याला वजन कमी करता आले नसते तर विनेश फोगाटप्रमाणे त्यालाही अपात्र ठरवण्यात आले असते.
Paris Olympic 2024 : नीरजचे विक्रमी रौप्य, सलग ऑलिम्पिक पदक जिंकण्याचा केला पराक्रम
10 तास काय घडलं?
प्रशिक्षक जगमंदर सिंग आणि विरेंद्र दहिया यांनी अमन सेहरावत याचे वजन कमी करण्याचा विडा उचलला. यासाठी त्याला योग्य ते मार्गदर्शन सुरू झाले. वजन कमी करण्याच्या प्रक्रियेची सुरुवात मॅटपासूनच झाली.
- अमन सेहरावत याने दीड तास मॅटवर सराव केला. तिथे त्याने स्टँडिंग कुस्ती खेळली. त्यानंतर त्याने घाम येऊन वजन कमी होण्यासाठी एक तास गरम पाण्याने आंघोळ केली.
- मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास अमन जिममध्ये आला आणि ट्रेडमिलवर जवळपास एक तास क्षणभरही न थांबता धावला. यामुळे त्याला जास्त घाम येईल आणि वजन कमी होईल अशी योजना यामागे होती.
- थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर अमन 5-5 मिनिटांच्या सौना बाथच्या सत्रात सहभागी झाला. त्यानंतरही अमनचे वजन 900 ग्रॅम जास्त दाखवत होते.
माझा लेक माझा अभिमान, नदीमही मुलासमान! नीरजच्या आईने मने जिंकली
- त्यानंतर प्रशिक्षकांनी त्याला हळूहळू जॉगिंग आणि वेगाने धावण्याच्या सूचना दिल्या. पहाटे साडे चार वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. त्यानंतर अमनचे वजन 56.9 किलोग्रॅमवर आले.
- त्यानंतर अमनने कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिसळून प्यायले. तसेच थोडी कॉफीही घेतली. एवढा घाम गाळल्यानंतर आणि थकल्यानंतरही त्याने झोप टाळली.
#WATCH | Paris: On wrestler Aman Sehrawat winning a bronze medal in the men’s freestyle wrestling event at #ParisOlympics2024, National Wrestling Coach Virendra Dahiya says, “We are happy…Aman stood on the expectations of the people of the country…Yesterday evening when the… pic.twitter.com/pnhiPv7rZS
— ANI (@ANI) August 9, 2024