‘दिवा महाराष्ट्राचा’मध्ये श्रावण फूड फेस्टिव्हल

सण- व्रतवैकल्य, उपवासाचा श्रावण सुरू झालाय. अनेकांनी महिनाभर मांसाहार बंद करून शाकाहार सुरू केलाय. अशावेळी काहीतरी वेगळं, स्वादिष्ट चाखायंच असेल तर माटुंगा पश्चिम येथील ‘दिवा महाराष्ट्राचा’ रेस्टॉरंट तुमच्यासाठी एकदम परफेक्ट ठिकाण आहे. कारण 6 ऑगस्टपासून ‘दिवा महाराष्ट्राचा’ मध्ये खास श्रावण फूड फेस्टिवल सुरू आहे. यामध्ये गोवा आणि महाराष्ट्रातील अशा रेसिपी, ज्या मुंबईत अन्य कुठेही मिळणार नाहीत, त्यांचा आस्वाद घेण्याची संधी मिळतेय.

मास्टरशेफ दीपा सुहास अवचट यांनी ‘दिवा महाराष्ट्राचा’ रेस्टॉरंटमध्ये ही श्रावण यात्रा सुरू केलेय. मागील 21 वर्षे ‘दिवा महाराष्ट्राचा’ मध्ये श्रावण साजरा होतोय. 2023 साली तर गोवा पोर्तुगीज, दिवा महाराष्ट्राचा, दक्षिण कल्चर करी या तीन रेस्टॉरंटमध्ये 108 शाकाहारी डिशेस सादर करून अनोख्या पद्धतीने श्रावणाचे सेलिब्रेशन झाले. दीपा अवचट दररोज नव्या रेसिपी सादर करतात.

मसाले भात, मूग- काजूची उसळ

‘दिवा महाराष्ट्राचा’ मधील श्रावण यात्रा म्हणजे खवय्यांना पर्वणी आहे. तिथे उपवासाच्या पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेता येईल. सूपमध्ये मटार बटाटा सूप, टोमॅटो सार, स्टार्टरमध्ये थालीपीठ, साबुदाणा वडे, फराळी कचोरी, मेन कोर्समध्ये मूग काजूची उसळ, वाटाण्याची ओली आणि सुकी उसळ, अननस आमटी सुरण, साबुदाणा – शेंगदाणा रस्सा याशिवाय मसाला भात, साबुदाणा खिचडी… असं बरंच काही. एवढं सगळं खाऊन झाल्यावर गोड हवंच ना… खजूर रताळे हलवा आणि साबुदाणा रताळा खीर हे गोड पदार्थ आहेतच.