रत्नागिरीच्या देऊदमधील कातळशिल्पाला स्मारकाचा दर्जा

रत्नागिरी जिह्यातील देऊद येथील कातळशिल्पाला राज्य संरक्षित स्मारक म्हणून दर्जा मिळाला आहे. त्यासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण झाली असून त्यासंदर्भात राजपत्रात प्रसिद्धी करण्याच्या सूचना आज राज्य सरकारने दिल्या.

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय आज जारी केला. रत्नागिरी जिह्यामध्ये रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर तालुक्यांमधील सड्यांवर पाषाणयुगातील अनेक कातळशिल्पे आहेत. त्याचे जतन करण्याची मागणी संशोधक मंडळींनी केली होती.