पुनावाला अभियांत्रिकी समूहाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती योहान आणि मिशेल पुनावाला हे उद्योगपती अनिल अंबानी यांचे शेजारी बनणार आहेत. कारण त्यांनी मुंबईतील कफ परेड येथे तब्बल 30 हजार चौरस फुटांचे आलिशान घर खरेदी केले आहे. या घराची किंमत तब्बल 400 ते 750 कोटी रुपयांच्या घरात आहे. योहान आणि मिशेल पुनावाला एमवायपी डिझाईन स्टुडीयो नावाचा इंटेरीयर डिझाईन स्टुडीयो चालवतात. सध्या पुण्यातील आलिशान घरात राहतात. कफ परेड येथील मालमत्ता खरेदी केल्याने मुंबईतील त्यांचे हे दुसरे आलिशान घर असेल. – मिशेल यांचे आर्ट कलेक्शन बंगल्याची शोभा आणखी वाढवणार असून जगभरातील अतिशय उत्तम चित्रकराची युनिक अशी तैलचित्रेही बंगल्याच्या सजावटीला चार चाँद लावणार आहेत.