
खासगी वाहनांवर ‘पोलीस’, ‘पोलीस विभागाचे बोधचिन्ह’ तसेच ‘महाराष्ट्र शासन’ अशी पाटी लावून प्रवास करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. परिवहन विभागाने एक पत्रक काढून अशा प्रकारे कोणी खासगी वाहनांवर पाटी लावलेली आढळेल त्यांच्यावर मोटर वाहन अधिनियम 1988 प्रमाणे कारवाई करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मात्र अशा पाट्या लावणाऱ्या वाहनांवर परिवहन विभागाकडून नियमितपणे कारवाई केली जात नाही.