राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात केली आहे. शिवसेनेरी किल्ल्यावरून या यात्रेस प्रारंभ झाला. शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या जुन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून या यात्रेला सुरुवात झाली. यावेळी एक मोठी दुर्घटना घडली.
क्रेनच्या मदतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातल्यानंतर ही क्रेन खाली येत असतानाच ट्रॉलीमध्ये बिघाड झाला. यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, रोहिणी खडसे आणि मेहबुब शेख पडता पडता वाचले. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
View this post on Instagram