Paris Olympic 2024 : नीरजला रौप्यपदक, पाकिस्तानच्या अर्शद नदीमचा सुवर्णवेध

टोकियो ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राला यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने 92.97 मीटर भालाफेक करीत ऑलिम्पिक विक्रमासह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. नीरजने 89.45 मीटर भालाफेक करीत दुसरे स्थान मिळविले. ग्रॅनाडाच्या पीटर अँडरसनला (88.54) कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. नीरज चोप्राने सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचा पराक्रम केला आहे.