Odisha News – गाडीच्या पार्किंगवरुन झालेल्या वादात दोन महिलांची हत्या

ओडीशा येथील भुवनेश्वरमध्ये एक विचीत्र घटना समोर आली आहे. गाडीच्या पार्किंगवरुन एकाचे दोन महिलांसोबत जबरदस्त भांडण झाले. ते इतके विकोपाला पोहोचले की त्याने आपल्या साथीदारांसोबत मिळून दोन महिलांची हत्या केल्याची भुवनेश्वरच्या कल्याणी प्लाझामध्ये घडली.

मीडिया वृत्तानुसार, भुवनेश्वरच्या एअरफिल्ड परिसरातील कल्याणी प्लाझामध्ये बुधवारी रात्री दोन महिलांचे एकासोबत गाडीच्या पार्किंगवरुन वाद सुरु झाला आणि वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. या भांडणात महिलांवर चाकूहल्ला केला आणि दोघीही गंभीर जखमी झाल्या. त्यांना घरच्यांनी तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कॅपिटल रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या माहितीनुसार, रुग्णालयात आणलेल्या एका महिलेने अर्ध्या वाटेतच प्राण सोडला होता तर दुसऱ्या महिलेने उपचारा दरम्यान प्राण सोडला.

भुवनेश्वच्या डीसीपी प्रतीक सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडीच्या पार्किंगवरुन दोन महिलांचे एका इसमासोबत भांडण झाले. या हल्ल्यात झालेल्या चाकूहल्ल्यात दोन महिलांचा जीव गमवावा लागला. रश्मी रंजन सेठी (28) आणि जुलू सेठी (35) अशी त्या महिलांची नावे आहेत. घटनेनंतर आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.