सुवर्णपदकाचे स्वप्न भंगल्यामुळे कांस्यपदकावर मोहर उमटवण्यासाठी हिंदुस्थानचा हॉकी संघ स्पेनविरुद्ध लढला. या सामन्यात स्पेनने आक्रमक खेळ करत सुरुवातीला टिम इंडियाला पिछाडीवर टाकले होते. मात्र कर्णधार हरमनप्रीत सिंगने दोन गोल करत टीम इंडियाला विजयी ट्रॅकवर आणले. कांस्यपदकाच्या लढाईत टीम इंडियाने स्पेनचा 2-1 असा पराभव करत हिंदुस्थानला चौथे कांस्यपदक पटकावून दिले.