जपानची भूमी गुरूवारी पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली आहे. दुपारच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले असून त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.1 इतकी नोंदवली गेली आहे. दरम्यान, भूकंपानंतर जपानला त्सुनामीचा इशाराही देण्यात आला आहे.
जपानच्या क्युशू आणि शिकोकू बेटांवर भूकंपाचे हे धक्के जाणवले आहेत. भूकंपासोबतच मियाझाकी, कोची, इहिमे, कागोशिमा आणि आयतासह जपानमधील अनेक किनारी भागात त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे. दरम्यान भूकंपाच्या धक्क्यामुळे मियाझाकी, क्युशूमध्ये 20 सेमी उंच समुद्राच्या लाटा उसळल्या आहेत.
जपानमध्ये याआधी वर्षाच्या सुरुवातीलाच भूकंप झाला होता. रिश्टर स्केलवर या भूकंपाची नोंद 7.4 एवढी नोंदवली गेली होती. या भूकंपाने तीन तासांत तब्बल 30 जोरदार धक्के बसले होते. त्यावेळीही जपानच्या पश्चिम किनारपट्टीला त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता.
नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी जपानमध्ये भूकंप; त्सुनामीचा तडाखा