सध्या देशभरात फेक मॅसेजेस, कॉल करून फसवणुकीचे प्रकार घडत आहे. तसेच आता नवीन अॅपद्वारे लाखो रुपये कमवण्यासाठी जाहिराती प्रसिद्ध होत आहेत. यापैकी काही असे अॅप होते की काही मिनिटांत हजारो ते लाखो रुपयांचे कर्ज आणि ॲपमधील गुंतवणुकीवर 18 टक्के दैनिक आणि साप्ताहिक व्याज यासारख्या सुविधा उपलब्ध करून द्यायचे. त्यामुळे अनेक तरुण त्याच्या जाळ्यात अडकले आणि व्याज फेडू न शकल्याने आत्महत्येस प्रवृत्त झाले. त्यामुळे अशा फ्रॉड अॅप्लिकेशनवर आता प्रशासनाने कारवाई करायला सुरुवात केली आहे.
दरम्यान आता असे अनेक अॅप आता समोर येत आहेत. त्यापैकी एक म्हणजे पवर बँक. हे अॅप नागरिकांना गुगल प्ले स्टोरवर सहज उपलब्ध होते. त्यामुळे लोकांनी त्याचा वापर करायला सुरुवात केली. परंतु काही काळानंतर या अॅपद्वारे लोकांची फसवूण केली जात असल्याचे समोर आले. हा अॅप चालवणारी एक टोळी होती जी नागरिकांना फसवायची. या प्रकरणी सर्वप्रथम उत्तराखंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पावर बँक ॲप चालवणाऱ्या कंपनीचे नाव इंडिया पावर होते. या कंपनीने मार्च 2021 ते जून 2021 या कालावधीत सुमारे 341 कोटी रुपयांची अवैध पद्धतीने लूट केली होती.
ईडीची मोठी कारवाई-
दरम्यान, या पावर बँक अॅपवर फसवणूक केल्याप्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. तसेच या अॅपशी संबंधित असलेल्यांना शोधण्यासाठी दिल्ली-NCR, मुंबई, गुजरातमध्ये शोध मोहीम राबवली आहे. या मोहिमेअंतर्गत अनेक पुरावे आणि इलेक्टॉनिक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. देव एंटरप्रायजेस, दिव्यम इंन्फाकॉन प्रायव्हेट लिमिटेड, तन्वी गोल्ड शी या काही खासगी संस्थाशी संबंधित संचालक आणि इतर अधिकाऱ्यांच्या ठिकाणी शोध मोहीम राबवण्यात आली.
तपास यंत्रणेच्या रडारवर आलेल्या प्रमुख कंपन्यांची नावे आणि त्यांच्या संचालकांची नावे पुढीलप्रमाणे आहेत –
1. M/s. देव एंटरप्रायझेस (विपुल जोशी )
2. M/s. दिव्यम इन्फ्राकॉन (संचालक चोठानी एम. गोबरभाई)
3. M/s. तन्वी गोल्ड प्रा. लिमिटेड (संचालक सुरेंद्र, अभय चपलोट)
4. M/s. कॅपिटल किंग मॅनेजमेंट प्रा. लिमिटेड (संचालक चिराग पटेल)