Vinesh Phogat Love Story : विनेशची फिल्मी ‘लव्ह स्टोरी’, ट्रेनमध्ये ओळख, एअरपोर्टवर प्रपोज; लग्नात घेतली ‘अष्टपदी’

विनेश फोगाट… गेल्या दोन दिवसांपासून टीव्ही, रेडिओ आणि सोशल मीडियावर या नावाशी संबंधित हजारो, लाखो पोस्ट तुम्ही पाहिल्या असतील. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 किलो वजनी गटात विनेश फायनलमध्ये पोहोचली होती. तिचे पदकही निश्चित झाले होते. पण नियतीला हे मान्य नव्हते आणि फायनलआधी नियमापेक्षा वजन जास्त भरल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले.

100 ग्रॅम वजनाने 140 कोटी हिंदुस्थानींच्या काळजाचा ठोका चुकवला. यानंतर गुरुवारी पहाटे विनेशने क्रीडाप्रेमींना आणखी एक धक्का देत कुस्तीला रामराम करण्याचा निर्णय घेतला. निराश झालेल्या विनेशचे संपूर्ण देश सांत्वन करत आहे. हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांनी तर ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक विजेत्या खेळाडूला जो मान, सन्मान दिला जातो, तोच विनेशलाही दिला जाईल अशी घोषणा केली.

विनेश फोगाट हिची कारकिर्द जेवढी रंजक आहे, त्याहून अधिक फिल्मी तिची लव्ह स्टोरी आहे. विनेश फोगाट आणि सोमवीर राठी यांची पहिली भेट 2011 मध्ये झाली होती. दोघेही रेल्वेत नोकरी करत होते. आधी भक्त भेटीगाठी होत होत्या आणि नंतर मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

हराया गया है! विनेश फोगाटने कुस्ती सोडल्यानंतर बजरंग पुनियाचा मोठा दावा

विमानतळावर लग्नाची मागणी

दोघांच्या भेटीगाठीची सिलसिला सुरुच होता. 2018 मध्ये विनेश फोगाटने आशियाई स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. इंडोनेशियामध्ये झालेल्या स्पर्धेत सुवर्ण जिंकून मायदेशी येणाऱ्या विनेशसाठी सोमवीर राठी याने खास सरप्राईज प्लान केला. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरारष्ट्रीय विमानतळावर सोमवारीने विनेशला लग्नाची मागणी घातली.

डिसेंबर 2018 मध्ये लग्न

दोघेही एकमेकांना बराच काळापासून ओळखत असल्यानेही विनेशनेही कोणतेही आढेवेढे न घेता सोमवीरच्या मागणीला होकार दिला. डिसेंबर 2018 मध्ये दोघांच्या लग्नाचा बार उडवून देण्यात आला. हरयाणातील चकरी दादरी येथे साध्या पद्धतीने दोघांचे लग्न झाले. या लग्नाला फक्त जवळच्या लोकांना आमंत्रित करण्यात आले होते.

‘सप्तपदी’ ऐवजी घेतली ‘अष्टपदी’

साधारणत: हिंदू रितीरिवाजाप्रमाणे लग्नामध्ये सप्तपदी घेतली. यावेळी वधू-वरांना सात वचने दिली जातात. मात्र विनेश आणि सोमवीरने अष्टपदी घेतली. यामागेही त्यांचा व्यापक दृष्टीकोन होता. आठवी फेरी त्यांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ, बेटी खिलाओ’, या उद्देशाने घेतली.

कोण आहे सोमवीर राठी?

सोमवीर राठी हा देखील कुस्तीपटू राहिला आहे. त्याचा जन्म हरयाणातील सोनीपत येथे झाला असून लहानपणापासूनच खरखौदा येथे त्याने कुस्तीचे धडे गिरवले. त्यानंतर त्याने राष्ट्रीय स्तरावरही कुस्ती खेळली आणि कांस्यपदकही जिंकले. त्यानंतर तो रेल्वेमध्ये नोकरीला लागला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)