विनायक गोखले,  मंजिरी वैद्य यांना ‘ग्रंथमित्र’ पुरस्कार

वाचनालयांना चालना मिळावी यासाठी राज्य सरकारकडून ‘ग्रंथमित्र’ पुरस्कार देण्यात येतो.  महामुंबई विभागातून विनायक गोखले आणि मंजिरी वैद्य यांना ‘ग्रंथमित्र’ पुरस्कार जाहीर झाला आहे. 26 जुलै रोजी झालेल्या निवड समितीच्या बैठकीनंतर उच्च आणि तंत्रशिक्षण विभागातर्फे 2022-23 साठीचे पुरस्कार सोमवारी जाहीर झाले. सातारा, बुलढाणा, अमरावती, वर्धा, परभणी आणि कोल्हापूर येथील ग्रंथालयांना सर्वोत्कृष्ट ग्रंथालयाचा पुरस्कार जाहीर झाला. राज्यस्तरीय पुरस्कारासाठी ठाण्याच्या मराठी ग्रंथसंग्रहालयाचे विनायक गोखले आणि धाराशीवच्या तुळजापूर येथील विजय वाचनालयाचे सुरेश जोशी यांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली. त्यांना 50 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय सेवक  (‘ग्रंथमित्र’) पुरस्कार या श्रेणीत विलेपार्ले येथील ग्रंथपाल मंजिरी वैद्य यांना 25 हजार रुपयांचा पुरस्कार मिळाला आहे.