महाविकास आघाडीची बुधवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर काँग्रेस नेते, विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या बैठकीबाबत माहिती दिली. या बैठकीत सकारात्मक वातावरणात चर्चा झाली असून किमान समान कार्यक्रमाबाबत आणि महाविकास आघाडीच्या रणनीतीबाबत चर्चा करण्यात आली. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून रणशिंग फुंकले जाणार आहे. त्यांची सुरुवात मुंबईपासून होणार असून षण्मुखानंद सभागृहात महाविकास आघाडीची 16 ऑगस्टला सभा होणार असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली.
After the MVA meeting, Maharashtra LoP and Congress leader @VijayWadettiwar says, “In today’s meeting, all three party leaders were present. All three parties discussed our manifesto, our formula, and our future course of action. We have planned to organise a big rally or a… pic.twitter.com/G1cZHWDYm2
— Mini Nagrare (@MiniforIYC) August 7, 2024
महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, आजच्या या बैठकीत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते उपस्थित होते. तिन्ही पक्षांनी आमचा जाहीरनामा, आमचा किमान समान कार्यक्रम आणि आमच्या पुढील रणनीतीबाबत चर्चा केली. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आमच्या नियोजनाला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीची 16 ऑगस्ट रोजी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात मोठी सभा घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील आगामी निवडणुकांसाठी महाविकास आघाडीची 16 ऑगस्ट रोजी एकत्र सभा होणार आहे. तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आमच्या जाहीरनाम्यावर काम सुरू आहे. आम्ही या महिन्याच्या अखेरीस आणखी एक किंवा दोन बैठका आयोजित करू. त्यात जागावाटपासह इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार असल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले.
महाविकास आघाडीच्या या बैठकीला काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधी मंडळनेते बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राजेश टोपे, अनिल देशमुख, सुनील भुसारा उपस्थित होते. तर शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विनायक राऊत उपस्थित होते.