रामलीला उत्सवाच्या धर्तीवर मुंबईतील गणेशोत्सव मंडळांना मंडपाच्या भाडय़ात आता 50 टक्के सवलत मिळणार आहे. ही सवलत मिळावी यासाठी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता.
श्री गणेशमूर्तींचे 11 ऑगस्टपासून आगमन सुरू होणार असल्याने आगमन मार्गातील खड्डे बुजवणे, वृक्षाची छाटणी तसेच लटकणारे केबल हे यावर त्वरित कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय गेल्या वर्षीची पृत्रिम तलावांची संख्या 250 पर्यंत वाढवण्यात येणार आहे. गणेशोत्सवात मोदक, पेढय़ामध्ये वापरण्यात येणारा निपृष्ट दर्जाचा मावा अन्य राज्यातून येत असेल तर त्यावर प्रत्येक महापालिका आरोग्य खाते लक्ष ठेवतील, पुलांच्या गळतीबाबत कार्यवाही करण्याचे पालिकेने मान्य केल्याची माहिती समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी दिली. वरळी लोटस जेट्टी, गेट वे ऑफ इंडिया येथे यंदाच्या वर्षी विसर्जनाबाबत कोणताही अडथळा येणार नाही यासाठी कार्यवाही करणार असल्याचेही पालिकेकडून सांगण्यात आल्याचे ते म्हणाले.