तीन नियमित प्रवेश फेऱ्या, कोट्याद्वारे होणारे प्रवेश आणि एक विशेष फेरीनंतर मुंबई विभागात अकरावीच्या तब्बल 2 लाख 15 हजार 766 जागा रिक्त राहिल्या आहेत. अकरावीसाठी 2 लाख 92 हजार 365 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी आतापर्यंत केवळ 63.66 टक्केच म्हणजेच 1 लाख 86 हजार 129 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत.
अकरावी ऑनलाइन प्रवेशाची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. विशेष प्रवेश फेरी 1 मध्ये कॉलेज अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांना 8 ऑगस्टपर्यंत आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. विशेष फेरीत 90 हजार 400 विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झाले असून त्यापैकी आतापर्यंत 42 हजार 617 विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला आहे, तर 4 जणांनी प्रवेश नाकारला असून 52 जणांनी प्रवेश रद्द केले आहेत. अकरावी प्रवेशासाठी अर्ज करूनही तब्बल 1 लाख 2 हजार 41 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले नाहीत.
अकरावी प्रवेशाची सध्याची स्थिती
प्रवेश क्षमता 4,01,895
एकूण विद्यार्थी 2,92,411
प्रवेश घेतले 1,90,370 (65.1 टक्के)
रिक्त जागा 2,11,525 (52.63 टक्के)