बांगलादेशात हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. पंतप्रधान शेख हसीना यांनी देशातून पलायन केलंय. हसीना यांनी देश सोडताना बांगलादेशात उद्रेक सुरू झालाय. बांगलादेशींनी हिंदू धर्मियांना लक्ष्य केले. 5 ऑगस्ट रोजी हिंदूंची घरे जाळण्यात आली. लुटमार आणि मंदिरांची तोडफोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
बांगलादेशात 91 टक्के मुस्लीम लोकसंख्या आहे, तर हिंदूंची संख्या 8 टक्के आहे. तिथल्या 27 जिह्यांमधील हिंदू लोकांच्या घरांवर हल्ले झाले. दिनाजपूर शहर आणि अन्य उपजिह्यांमध्ये कमीत कमी 10 हिंदू घरांवर हल्ले झाले. खुलना भागातील इस्कॉन मंदिरात मूर्तीची तोडफोड करण्यात आली. मंदिराला आग लावण्यात आली. यामध्ये दोघांचा मृत्यू झाल्याचे समजते. दरम्यान, हिंसाचारातील मृतांचा आकडा 440 वर गेला आहे.