
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी सदनात केलेल्या भाषणात प्रियांका गांधी यांचा उल्लेख करत त्या अंबानींच्या लग्नात उपस्थित राहिल्याचा दावा केला होता. त्या दाव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत तडाखेबंद भाषण करत भाजपला फटकारले आहे. ”सत्तेत राहण्यासाठी भाजप फेक नरेटिव्ह मांडून लोकांना बदनाम करते”, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी भाजपला फटकारले
”प्रियांका गांधी या सदनाच्या सदस्या नाहीत. एक महिला म्हणून त्यांच्या बाबतीत कुणीही काही बोलणे चुकीचे आहे. त्या अंबानींच्या लग्नात गेल्या नव्हत्या आणि गेल्या असतील तरी त्यात काय चूक आहे. ज्या लग्नात पंतप्रधान जाऊ शकतात तिथे जाण्यात काय चोरी आहे. एखाद्याच्या बाबतीत इथे बोलणं चुकीचं आहे. फेक नरेटिव्ह मांडू नका. भाजपचा हाच प्रॉब्लेम आहे ते फेक नरेटिव्ह मांडतात आणि लोकांना बदनाम करतात. त्यांनी असंच माझ्या कुटुंबाला देखील बदनाम केलं. त्यांनी कधी विचार केलाय आमच्या कुटुंबाला काय वाटत असेल. खोट्या आरोपाखाली लोकांना अटक करतात तेव्हा त्यांच्या कुटुंबाला काय वाटत असेल याचा विचार करतात का? सत्तेत राहण्यासाठी ते हे सगळं करत आहेत”, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी भाजपला फटकारले.
”पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरुवातील ना खाऊंगा ना खाने दुंगा चा नारा दिला. मी त्या नाऱ्याने प्रभावित झाले होते. पण महाराष्ट्रात व देशात तसे काही होत असल्याचे दिसून येत नाहीए. महाराष्ट्रातील एक वरिष्ठ नेते डर्टी डझनचा आरोप करायचे. NCP ला नॅचरली करप्ट पार्टी म्हणायचे. आता जे स्वत:ला ओरिजनल NCP म्हणवतात ते भाजपसोबतच आहेत. ओरिजन पार्टी करप्ट आहे तर ती आता त्यांच्यासोबत आहे. त्यामुळे आता फायनॅन्स मंत्र्याने सांगावं की नॅचरल करप्ट पार्टी त्यांच्यासोबत आहे तर त्यांच्याबाबतीत इनकम टॅक्स सीबीआय, ईडीचे काय झाले? व डर्टी ड़झनचे काय झाले, असा खणखणीत सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
”अमित शहा जे बोलले होते की जर तुम्ही एक बोट आमच्याकडे दाखवता तेव्हा तीन तुमच्याकडे असतात. मला भाजपला हेच सांगायचं आहे की तुम्ही जेव्हा आमच्याकडे एक बोटं दाखवता तेव्हा तीन तुमच्याकडे असतात”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.