मिंधे सरकार चमकोगिरीसाठी उधळणार 100 कोटी , शिवसेनेची सडकून टीका

सरकारी योजना लोकांपर्यंत पोहचविण्याच्या नावाखाली मिंधे सरकारकडून लोकांच्या पैशांची उधळपट्टी सुरू असल्याची टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून करण्यात आली आहे. मिंधे सरकारकडून योजनांच्या जाहिरातींसांठी अधिक 100 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आता जाहिरातींचे एकूण बजेट हे 374 कोटींवर पोहोचले आहे. त्यावरून शिवसेनेने मिंधे सरकारला फटकारले आहे.

”मिंधे-भाजप सरकार सरकारी जाहिरातींसाठी आणखी 100 कोटी रुपयांची उधळण करणार असल्याचे समोर आले आहे. त्याकरिता अवघ्या दहा दिवसांत सरकारने 374 कोटींची तरतूद केली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपल्या फसव्या योजना घरोघरी पोहचवण्यासाठी सुरू असलेली ही मिंधे सरकारच्या उधळपट्टीत जनतेचा कररुपी पैसे वाया जात आहे. बेरोजगारी कमी करण्यासाठी योग्य उद्योग धोरण अमलात आणायचे सोडून महाराष्ट्राचाच पैसा लुटून पुन्हा जनतेच्याच पदरी टाकण्यात मिंधे सरकार धन्यता मानत आहे”, अशा शब्दात मिंधे सरकारवर निशाणा साधला.