#Bangladesh आंदोलकांचा अमेरिकेतही धुडगूस; न्यूयॉर्क मधील बांगलादेशच्या वाणिज्य दूतावासावर केला हल्ला, मुजीबूर रहमान यांचे चित्रं हटवले

Bangladesh consulate in US

बांगलादेशी आंदोलकांनी न्यूयॉर्कमधील बांगलादेशच्या वाणिज्य दूतावासावर हल्ला केला आणि शेख मुजीबुर रहमान यांचे चित्र काढून टाकले. आंदोलक इमारतीच्या आत घुसले आणि त्यांनी बांगलादेशच्या संस्थापकाची प्रतिमा खाली खेचून घेतली असे दृश्यांमध्ये दिसून आले.

बांगलादेशातील अराजकतेच्या दरम्यान ही घटना घडली आहे. बांगलादेशातील अराजकामुळे दिवंगत शेख मुजीबुर रहमान यांची मुलगी शेख हसिना यांनी पदाचा राजीनामा देऊन देश सोडून पळ काढला आहे. या आंदोलना दरम्यान आतापर्यंत 100 लोकांचा मृत्यू झाला आहे.