शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार आणि भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत, उपाध्यक्ष अजित साळवी यांच्या मार्गदर्शनानुसार संयुक्त सरचिटणीस संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली खार पश्चिम येथील विलिंगडन पॅथलिक जिमखान्यावरील कामगारांनी नुकताच महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेला हद्दपार करून भारतीय कामगार सेनेत प्रवेश केला आहे.
कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावर नुकताच भारतीय कामगार सेनेचा फलक लावून त्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस संजय कदम यांनी व्यवस्थापनाबरोबर मीटिंग घेऊन चर्चा केली आणि त्यानंतर कामगारांना मार्गदर्शन केले. यावेळी व्यवस्थापनाकडून मॉरिस पॅथरो, एरोल्ड फर्नांडिस, दीनानाथ सावंत, एंद्रिता डिसिल्वा यांनी सर्व पदाधिकाऱयांचे स्वागत केले. सदर युनिट परत आणण्यासाठी संजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहचिटणीस मिलिंद तावडे यांनी विशेष प्रयत्न केले. चिटणीस संतोष कदम, सूर्यकांत पाटील, राजा ठाणगे, योगेश आवळे, सहचिटणीस विजय शिर्पे, दिनेश परब, युनिट कमिटीचे अध्यक्ष विजय दळवी, सदस्य दत्ताराम गुरव, राजेश सोनावणे, श्रीकांत परब, प्रसाद पवार यावेळी उपस्थित होते.