डिझेल संपल्याने एसटीची सेवा ठप्प, रत्नागिरीत प्रशासनाचा भोंगळ कारभार

रत्नागिरी एसटी डेपोतील डिझेल संपल्यामुळे एसटीची वाहतूक ठप्प झालीआहे. गेले दोन दिवस डिझेलचा टॅंकर आला नसल्याची माहिती मिळत आहे. एसटी बससेवा ठप्प झाल्याने शालेय विद्यार्थी, कर्मचारी वर्ग आणि ग्रामस्थांचे हाल होत आहेत. एसटी बससेवा ठप्प झाली असताना एसटी प्रशासनाने मात्र प्रवाशांना कोणतीही सूचना दिलेली नाही. एसटी प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा प्रवाशांना फटका बसला आहे.

रत्नागिरी एसटी डेपोतील डिझेल संपल्यामुळे आज मोजक्याच गाड्या सुटल्या.बाकी सर्व गाड्या डेपोतच थांबून होत्या.डिझेलचा टॅंकर न आल्यामुळे एसटीची सेवा ठप्प झाली आहे.एसटी प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका प्रवाशांना बसला आहे.आज सायंकाळी एसटी स्टॅंण्डवर प्रवासी ताटकळत उभे होते.