राज ठाकरेंच्या बॉडीगार्डने धक्काबुक्की केली, मराठा आंदोलकांचा आरोप

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यावरून मराठा आंदोलक संतापले आहेत. राज ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर असून सोमवारी धाराशिव येथे आले आहे. धाराशिव येथे राज ठाकरे राहत असलेल्या पुष्पकपार्क हॉटेलमध्ये सध्या मराठा आंदोलक घुसले असून ते तिथे ठिय्या आंदोलन करत आहेत. या आंदोलनादरम्यान राज ठाकरे यांच्या बॉडिगार्ड्सनी धक्काबुक्की केल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केली आहे.

”राज ठाकरेंची ही दुसरी वेळ आहे. गेल्या वेळेला आम्ही वाशीवरून परत आलो होतो तेव्हा ते म्हणाले होते की जर तुम्हाला आरक्षण मिळालं आहे तर पुन्हा उपोषण का करता. सोलापूरात आज एक वक्तव्य केलं की मराठा समाजाची डोकी भडकवली जात आहेत. त्यांनी आम्हाला सांगावं की आमची डोकी कोण भडकवत आहे. मराठा आरक्षणाबाबत त्यांची भूमिका काय आहे हे स्पष्ट करावं. त्यांची भूमिका आम्हाला पटली नाही तर आम्ही त्यांच्या प्रत्येक कार्यकर्तायंचा नेत्याचा व पक्षाचा निषेध करू, असे मराठा आंदोलकांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.

”राज ठाकरे यांनी त्यांच्या आजुबाजूच्या बॉडीगार्ड्सना ताकीद द्यावी की मराठा समाजाच्या छातीला हात लावू नये. बॉडीगार्ड आला आणि पत्रकारांशी बोलणाऱ्या आमच्या कार्यकर्त्यांला दमदाटी केली व त्याच्या छातीवर हात घातला”, असा आरोप मराठा आंदोलकांनी केला.