बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा, हिंदुस्थानात आश्रय घेणार?

बांग्लादेशमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आहे. आणि हिंदुस्थानात दाखल झाल्या आहेत. दुसरीकडे बांग्लादेशात हिंसाचार वाढला असून लष्कराच्या हातात देश जाण्याची शक्यता आहे.

बांग्लादेशात आरक्षणावरून वाद झाला होता. त्याचे रुपांतर हिंसेत झाले. बांग्लादेशात आरक्षणाच्या मुद्द्यावरून 100 लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. आता शेख हसीना या पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्या आहेत. सैन्याचा हेलिकॉप्टरने शेख हसीना हिंदुस्दाथानात दाखल झाल्याचे वृत्त आज तक या हिंदी वृत्तवाहिनीने दिले आहे. तसेच शेख हसीना या लंडनला रवाना होऊ शकतात असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

 

बांग्लादेशात जमाव हिंसक झाला होता. हा जमाव पंतप्रधान आवासात शिरल्याने शेख हसीने देशातून बाहेर पडल्या. संपूर्ण देश पोलिस आणि सैन्याने ताब्यात घेतला आहे. लवकरच बांग्लादेशच्या सैन्याची पत्रकार परिषद होणार आहे. त्यामुळे बांग्लादेशात लष्कराची सत्ता येणार का असा अंदाज व्यक्त केला जात आहे.