देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील कच्चे लिंबू आहे. मोदी-शहांनी फुगवून कलिंगड झाले होते, अशी टोलेबाजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. ते दिल्लीत बोलत होते.
महाविकास आघाडीचे 9-10 लोकं माझ्यावर बोलतात. पण चक्रव्यूय भेदायची मला माहिती असल्याचे फडणवीस म्हणाले होते. याला उत्तर देताना राऊत म्हणाले की, लोकसभा निवडणुकीमध्ये चक्रव्युहाची काय अवस्था झाली हे आपण पाहिजे. त्यामुळे फडणवीसांच्या वक्तव्याकडे महाराष्ट्रही गांभीर्याने पहात नाही. अनिल देशमुख यांनी जो खुलासा केला आणि त्या खुलाशावर उत्तर देण्यासाठी फडणवीस यांना तुरुंगातील एका गुन्हेगाराची प्रवक्ता म्हणून मदत लागले. यातूनच ते चक्रव्युहात अडकल्याचे स्पष्ट दिसतंय.
अनिल देशमुख यांना काल एक मुद्दा मांडला. चांदीवाल आयोगाचा अहवाल उघड का करत नाहीत. 11 महिने या आयोगाची सुनावणी झाली असून 1400 पानांचा हा अहवाल आहे. यात अत्यंत स्फोटक माहिती आहे. ती समोर येण्याआधीच फडणवीस यांनी शिवसेनेचे आमदार फोडत सरकार पाडले, असा घणाघात राऊत यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील कच्चे लिंबू आहे. मोदी-शहांनी फुगवून त्याचे कलिंगड झाले होते. चांदीवाल अहवास सादर झाल्यावर पुढच्या 10-12 दिवसात त्यांनी आमचे सरकार पाडले. यात अत्यंत स्फोटक माहिती असून हा अहवाल समोर येऊ नये म्हणून फडणवीस यांनी आमचे सरकार पाडले. त्यामुळे त्यांनी स्वत:ला अति हुशार असल्याचा आव आणू नये. त्यांची हुशारी आम्ही लोकसभेलाच काढली, असा टोलाही राऊत यांनी लगावला. तसेच फडणवीस हे राजकारण करत नाहीत तर लफंग्यांची टोळी चालवतात. महाराष्ट्राला लागलेला हा दृष्ट शाप आहे. त्यांच्यामुळेच महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुसंस्कृतपणा नष्ट झाला, असा आरोपही राऊत यांनी केला.
उद्धव ठाकरे यांचा तीन दिवसीय दिल्ली दौरा, संजय राऊत यांनी दिली माहिती
मुंबईची लूट होऊ देणार नाही
धारावी पुनर्वसन प्रकल्पासंदर्भात कोणत्याही प्रकारचा घोटाळा किंवा मुंबईची लूट शिवसेना होऊ देणार नाही. धारावीच्या बदल्यात मुंबईतील 20 भुखंड अदानीला देण्याचा डाव वर्षा बंगल्यावर सुरू आहे. आमच्यावर कितीही दबाव आला, इशारे दिले, धमक्या दिल्या तरीही हा डाव, मुंबईची लूट होऊ देणार नाही. धारावीमध्ये 600 एकर भुखंड आहे. 8 लाख लोकांना पात्र अपात्र याचा विचार न करता 500 स्क्वेअर फुटांची घरं मिळावी. त्यांचे पुनर्वसन त्याच जागेवर व्हावे. धारावी संदर्भात शिवसेनेची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे, असेही राऊत म्हणाले.
मजबूत विरोधी पक्षाची मोदींच्या मनात भीती
अधिवेशनाच्या फक्त पहिल्या आणि अर्थसंकल्पाच्या दिवशी संसदेत उपस्थित राहणाऱ्या पंतप्रधान मोदींचाही राऊत यांनी समाचार घेतला. मोदी नेहमी पंडित नेहरूंचा दाखला हेतात. पण नेहरूंची संसदीय लोकशाहीवर गाढ श्रद्धा होती. विरोधी पक्षनेत्यांची भाषणं असायची तेव्हा नेहरू आवर्जुन संसदेत उपस्थित रहायचे. नेहरू, लाल बहादुर शास्त्री यांच्यासह इतरांनीही या संसदीय परंपरांचे पालन केले. पण मोदींच्या मनात मजबूत विरोधी पक्षाची भीती असून राहुल गांधी यांच्या रुपाने जे तुफान निर्माण झालंय त्याचा ते सामना करू शकत नाहीत, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.