पती-पत्नी और वो…पत्नीने केला कारनामा अन् प्रेयसीने घेतली पोलिसात धाव

मुंबईत एक अनोखी घटना समोर आली आहे. एका 54 वर्षीय व्यक्तीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे कळल्यावर पत्तीने त्याच्या मोबाईलमध्ये असलेले खासगी फोटो सोशल मीडायावर व्हायरल करण्याची महिलेला धमकी दिली. हे जेव्हा त्या पतीच्या प्रेयसीला कळाले त्यावेळी तिने पोलिसात धाव घेत त्या पती-पत्नीविरोधात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुासर, महिलेने आरोप केला आहे की, प्रियकराने तिचे गुप्तपणे फोटो काढले आणि त्यांचे खासगी फोटो काढले आणि व्हिडीओही रेकॉर्ड केले. नंतर पत्नीने इतर कुटुंबातील सदस्यांना पाठवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील एका उच्चवर्गीय सोसायटीत ही महिला तिच्या पती आणि मुलीसोबत राहते. जबानात महिलेने सांगितले की, 2017 मध्ये 54 वर्षीय व्यक्ती पत्नी आणि दोन मुलांसह एकाच मजल्यावर राहण्यासाठी आले होते.

महिलेने दिलेल्या माहितीनुसार, 2019 च्या सुमारास तिची त्या व्यक्तीशी मैत्री झाली आणि त्यानंतर त्याचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघं फोनवर बोलू लागलो आणि एक दिवस त्याच्या घरी बायको आणि मुलं नसताना त्याने त्याच्या घरी बोलावलं. तेव्हापासून त्यांच्या घरी कोणी नसताना तिचे त्याच्या घरी येणेजाणे होते. मात्र 15 जुलै रोजी तक्रारदार महिलेला त्या व्यक्तीचा पत्नीचा फोन आला आणि तिने दोघांमध्ये काय सुरु आहे याबाबत विचारणा केली. त्यावेळी या तक्रारदार महिलेने फोन डिस्कनेक्ट केला. त्यांनंतर त्या व्यक्तीची पत्नी तिच्या घरी गेली आणि त्या व्यक्तीच्या पत्नीने त्यांचे खासगी फोटो आणि व्हिडीओ दाखवले.

तक्रारदार महिलेने दावा केला आहे की, त्या व्यक्तीच्या पत्नीने ते गुपचूप फोटो काढले होते आणि त्यांचे खासगी फोटो आणि त्यांचे व्हिडीओ केले होते. तिने ते फोटो-व्हिडीओ कुठेही शेअर करु नये अशी विनंती केली व्यक्तीच्या पत्नीकडे केली होती. मात्र व्यक्तीच्या पत्नीने तिचे काही ऐकले नाही. तिने ते फोटो-व्हि़डीओ महिलेच्या नातेवाईकांना पाठवले. तक्रारदार महिलेने पोलिसांना सांगितले की, त्या व्यक्तीच्या पत्नीने तिची बदनामी केली त्यामुळे तिला आणि तिच्या कुटुंबाला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. मात्र तरीही मी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली नव्हती. मात्र मंगळवारी तक्रारदार महिलेच्या नातेवाईकाला एका अनोळख्या नंबरवरुन फोन आला की, ते फोटो आणि व्हिडीओ पॉर्न साईटवर अपलोड करण्याची धमकी दिल्याने महिसा घाबरली. तिने हे प्रकरण पोलिसांकडे नोंदवले आणि तक्रार दाखल केली.