Paris Olympic 2024 : हिंदुस्थान ‘शूट’ ब्रिटन ‘आऊट’! 10 खेळाडूंसह खेळत सेमीफायनल गाठली

ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानच्या हॉकी संघाने उपांत्य फेरीत धडक दिली आहे. शूटआऊटमध्ये हिंदूस्थानकडून ग्रेट ब्रिटनचा 4-2 ने पराभव करण्यात आला आहे.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रविवारी हिंदुस्थान आणि ग्रेट ब्रिटनमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळाला. हिंदुस्थानच्या हॉकी संघाने जबरदस्त खेळी करत पॅरीस ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरित आपले स्थान निश्चित केले आहे. हिंदुस्थानच्या हॉकी संघाने  ग्रेट ब्रिटनचा पराभव करत उपांत्य फेरित धडक दिली आहे. दोन्ही संघांनी 1-1 अशी बरोबरी केल्याने मॅचचा निकाल पेनल्टी शूटआऊटमध्ये लावण्यात आला. हिंदुस्थानने शूटआऊटमध्ये  ग्रेट ब्रिटनचा 4-2 ने पराभव करत 10 खेळाडूंसह खेळत सेमीफायनल गाठली.

पहिल्या क्वार्टरमध्ये एकही गोल झाला नाही. मात्र, 17व्या मिनिटाला अमित रोहितदासला रेड कार्ड दिल्याने हिंदुस्थानला मोठा धक्का बसला. त्याला मैदान सोडावे लागले आणि हिंदुस्थानला उर्वरित सामना 10 खेळाडूंसह खेळावा लागला. या सामन्यात कर्णधार हरमनप्रीतने हिंदुस्थानचे खाते उघडले. त्याने 22व्या मिनिटाला गोल केला. पॅरिस ऑलिम्पिकमधील हरमनप्रीतचा हा सातवा गोल होता. हिंदुस्थानकडून हरमनप्रीत सिंह, सुखजीत सिंह, ललित कुमार उपाध्याय आणि राज कुमार पाल यांनी एक-एक असे 4 गोल केले.