पोलिसांच्या 1930 या सायबर हेल्पलाईनने गेल्या सात महिन्यांत मोठी कामगिरी बजावली आहे. ऑनलाइन फसवणूक झाल्यानंतर नागरिकांनी तत्काळ या हेल्पलाइनवर संपर्क साधून तक्रार दिल्याने तब्बल 100 कोटी 84 लाख 57 हजार इतकी रक्कम सायबर भामटय़ांच्या खिशात जाण्यापासून वाचविण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत 1930 या सायबर हेल्पलाइनवर ऑनलाइन फसवणुकीच्या 35 हजार 918 इतक्या तक्रारींची नोंद झाली. शेअर ट्रेडिंग, फेडेक्स व अन्य कुरीअर फ्रॉड, डिजिटल अरेस्ट फ्रॉड, ऑनलाइन टास्क फ्रॉड आदी फसवणुकीच्या तक्रारी सर्वाधिक होत्या.