वीज ग्राहकांसाठी ‘बेस्ट’ची अभय योजना

best_undertaking_logo

वीजदेयकाची थकबाकी न भरल्यामुळे ज्यांचे वीजमापक 1 ऑक्टोबर 2006 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत काढण्यात आले आहेत, अशा वीज ग्राहकांसाठी ‘बेस्ट’च्या विद्युत विभागाने ‘अभय योजना 2024’ आणली आहे. या योजनेअंतर्गत ग्राहकांना थकबाकीवरील व्याज व विलंबित आकारांची माफी देण्यात येणार आहे. या योजनेचा फायदा वीज ग्राहक 1 ऑगस्ट 2024 ते 30 जानेवारी 2025 या सहा महिन्यांच्या कालावधीत घेऊ शकतात. या योजनेच्या अधिक माहितीसाठी व योजनेचा लाभ घेण्यासाठी वीज ग्राहकांनी संबंधित प्रभागाच्या विभागीय अभियंता, ग्राहकसेवा यांच्याशी संपर्प साधावा, असे आवाहन बेस्ट प्रशासनाकडून करण्यात आले आहे.