>> योगेश जोशी
ऑगस्ट महिना सुरू झाला असून या महिन्यात आपल्या कालगणनेप्रमाणे श्रावण महिनाही सोमवार 5 ऑगस्टपासून सुरू होत आहे. या महिन्यात अनेक चांगले योग होत असून त्याचा काही राशींना चांगलाच फायदा होणार आहे. तर काही राशींनी सावध राहण्याची गरज आहे. यंदा श्रावण महिन्यात 5 सोमवार येत आहेत. तसेच शुक्रादित्य योग, बुधादित्य योग, नवपंचम योग, गजकेसरी योग, कुबेर योग, शश योग, त्रिग्रही योग आणि लक्ष्मीनारायण योग यासारखे शुभ योग जुळून येत आहेत.
या महिन्यात त्रिगर्ही योग आणि लक्ष्मी नारायण योगांचा अनेकांना फायदा होणार असून त्यांची तिजोरी भरणार आहे. 31 जुलै रोजी शुक्र सिंह राशीत प्रवेश करत आहे. तर या राशीत बुध आधीपासूनच आहे. शुक्र आणि बुध हो दोन ग्रह एका राशीत येत असल्याने लक्ष्मीनारायण शुभ योग तयार होत आहे. तसेच सोमवारी 5 ऑगस्ट रोजी चंद्रही सिंह राशीत येणार असल्य़ाने त्रिग्रही योग ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला जुळून येणार आहे. तसेच सूर्य 16 ऑगस्ट रोजी स्वराशीत म्हणजेच सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे सूर्याचा स्वराशीील प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. सूर्याचा सिंह राशीत प्रवेश झाल्यावर शुक्र आणि सूर्याचा शुक्रादित्य योग तयार होत आहे. हा एक राजयोग मानला गेला आहे. या योगाची काही राशींना शुभफले मिळणार आहेत.
ऑगस्ट महिन्यात तयार होणाऱ्या शुभ योगांचा वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ आणि धनू या राशींना चांगला फायदा होणार आहे. या काळात या राशींवर भोलेनाथ शिवशंकर यांटची कृपादृष्टी राहणार आहेत. त्यामुळे या राशींची आतापर्यंत अडकलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. तसेच कामाच्या ठिकाणी चांगले सहकार्य देखील मिळणार आहे. या राशींना या योगाचा काय फायदा होणार आहे, ते जाणून घेऊया.
वृषभ राशीला या महिन्यातील योग शुभ फलदायी आहेत. सुख-सुविधा, संपत्ती मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. उद्योग, धंदा किंवा व्यावसायिकांना चांगले प्रस्ताव मिळणार असून चांगला आर्थिक लाभ होणार आहे. या काळात विद्यार्थ्यांनाही यश मिळण्याची शक्यता आहे. अनेकांच्या करिअरमध्ये नवीन टप्पे येतील, त्यात त्यांना यश मिळेल. नवीन नोकरी किंवा असलेल्या नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. या महिन्यात वाहन किंवा गृहखरोदीचे योग बनत आहेत.
मिथुन राशीला या महिन्यात नशिबाची चांगली साथ मिळणार आहे. या महिन्यात कुटुंबियांचे सहकार्य मिळणार आहे. नोकरदारांना पदोन्नतीसह नवीन संधी मिळतील. नोकरी, धंदा, व्यापार असणाऱ्यांना या आधी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला नफा होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण उत्साही असल्याने घरात प्रसन्न वातावरण असेल. विद्यार्थ्यांनी या काळात अभ्यासावर लक्ष केंद्रीत केल्यास त्यांना अधिक फायदा होणार आहे.
ऑगस्ट महिना कर्क राशीसाठी अमुकूल असून द्वितीय म्हणजे या राशीच्या दुसऱ्या भावात सिंह राशीत 16 ऑगस्टपासून तयार होणाऱ्या शुक्रादित्य योगाचा या राशीला चांगला फायदा होणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या उत्तरार्धात या राशींना अचानक धनलाभाचे योग आहेत. महिन्याच्या सुरवातीच्या काळात खडतर मेहनत केल्यास उत्तरार्धात त्यांचे चांगले परिणाम दिसणार आहेत. या काळात विद्यार्थ्यांना अपेक्षित यश सहज मिळणार आहे. राजकारण आणि समाजसेवेशी संबंधित असणाऱ्या लोकांची प्रतिमा उंचावणार आहे. त्यामुळे हा महिना कर्क राशीसाठी यशाचा आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढवणार ठरणार आहे. तसेच 16 ऑगस्टनंतर अडकलेले पैसे मिळण्याची तसेच रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. तसेच वाणी स्थानात होणाऱ्या महत्त्वाच्या योगाने तुम्ही तुमच्या बोलण्यातून इतरांवर प्रभाव पाडू शकाल.
सिंह या राशीत अनेक शुभ योग तयार होत असल्याने ही या महिन्यातील लाभदायक रास ठरणार आहे. या राशीला सर्व बाजूंना मदत मिळणार असून सर्वच क्षेत्रात फायदे होणार आहेत. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची अनेक संधी समोर येतील. करिअरमध्ये मोठा आणि महत्त्वाचा पल्ला गाठण्यात यश मिळेल. स्वतःच्या राशीत सूर्य आणि शुक्र असल्याने आत्मविश्वास वाढणार आहे. मात्र, अतिआच्मविश्वासामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित मालमत्तेचे वाद सुटण्याची शक्यता आहे. तसेच गुंतवणुकीतून चांगला लाभ होण्याचे योग आहेत. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच लग्नाचे प्रस्ताव येण्याचीही शक्यता आहे. विद्यार्थ्यांनाही या काळात मित्रांची मदत होणार आहे. त्यामुळे हा महिना सिंह राशीसाठी लाभदायक ठरणार आहे.
कन्या राशीच्या बाराव्या स्थानात हे योग होत असल्याने खर्च वाढणार आहेत. मात्र, काही ठिकाणी चांगल्या संधीही मिळणार आहेत. धार्मिक कामात आणि पूजापाठ यामध्ये आवड वाढेल. ध्यानधारणा केल्यास मनशांती मिळणार आहे. नोकरीत सहकाऱ्यांची मदत मिळणार आहे.या काळात प्रवास होण्याची शक्यता असून प्रवासातून लाभ होण्याची शक्यता आहे. तसेच घरातही आनंदी वातावरण असेल.
तूळ राशीच्या लाभ स्थानात महत्त्वाचे योग तयार होत असल्याने अचानक धनलाभाचे योग आहेत. तसेच अनेक आर्थिक समस्या मार्गी लागणार आहेत. मात्र, या काळात अनाठायी किंवा वायफळ खर्च टाळण्याची गरज आहे. उत्पन्न वाढण्याची शक्यता असल्याने पैशांची चणचण भासणार नाही. तसेच या काळात खरेदीकडे कल वाढण्यची शक्यता आहे. व्यापार, उद्योग, धंदा असलेल्यांना व्यापरवृध्दीसाठी अनेक चांगल्या संधी मिळणार आहेत. तसेच परदेशातील नातेवाईक आणि कुटुंबियांकडून चांगली बातमी मिळण्याचे योग आहेत.
धनू राशीच्या भाग्य स्थानात त्रिग्रहीस लक्ष्मीनारायण आणि शुक्रादित्य योग तयार होत असल्याने या काळात धनू राशीला नशिबाची चांगली साथ मिळणार आहे. तसेच या राशीचे नेतृत्वगुण दिसून येणार आहेत. कुटुंबातील जुने वाद मिटल्याने घरात चांगले वातावरण असेल. परदेशात जाण्याची इच्छा असलेल्यांना चांगली संधी मिळण्याची योग आहेत. भाग्य स्थानात चांगले योग असल्याने धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. रखडलेली अनेक कामे मार्गी लागण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे धनू राशीसाठी हा महिना फायद्याचा ठरणार आहे.
इतर राशींना या काळात खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तसेच विनाकारण वादात अडकण्याची शक्यता असल्याने शांत राहणे फायद्याचे ठरणार आहे. या काळात मनशांती ठेवल्यास या राशींच्या अडचणी कमी होणार आहेत.