परीक्षण – सायबर गुन्हेगारीचे भेदक वास्तव

>> श्रीकांत आंब्रे

आजकाल मोबाइलवरून किंवा सोशल मीडियातून मिठ्ठास संवाद साधून, वेगवेगळी आमिषे दाखवून अशिक्षितांपासून सुशिक्षितांपर्यंत अनेकांना सहजपणे आपल्या जाळ्यात अडकविणारे आणि क्षणात आपले बँक खाते एका झटक्यात रिकामे करणारे तसेच स्त्राr-पुरुषांशी गोड-गोड  बोलून त्यांचे अश्लील चित्रण करून ते व्हायरल करण्याच्या धमक्या देत लाखो रुपये उकळणाऱ्या ठकसेनांचे प्रताप आपण वाचत असतो. अशा महाभागांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी कोणती सावधगिरी कशी बाळगावी याचं सुयोग्य आणि सुबोध मार्गदर्शन करणारं ‘सायबर आटाक – आधुनिक तंत्रज्ञानाच्या मुखवट्याआडचा भेसूर चेहरा’ हे उपयुक्त पुस्तक सद्य परिस्थितीत सर्वांनाच मार्गदर्शक ठरणारं आहे.

पुणे पोलिसांच्या सायबर शाखेत सायबर गुन्हय़ांचा छडा लावण्याचं महत्त्वपूर्ण काम चतुराईने करताना अशा अनेक गुन्हय़ांचा शोध लावणारे आणि जनतेला यापासून बचावाचं योग्य मार्गदर्शन करणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डा. संजय तुंगार व ज्येष्ठ पत्रकार सुधीर साबळे यांच्या संयुक्त लेखन प्रकल्पातून या पुस्तकांची निर्मिती झाली आहे. अनेक क्षेत्रांत या सायबर गुन्हेगारीने हातपाय पसरले आहेत. झटपट श्रीमंत होण्याच्या मोहापायी अनेक नागरिक या सायबर गुन्हय़ांचे बळी कसे ठरतात हे सारंच या पुस्तकात वाचण्यासारखं आणि त्यापासून बरंच शिकण्यासारखं आहे. शेअर बाजारात कमी कष्टात भरपूर पैसे मिळवण्याची गोत्यात आणणारी प्रलोभनं माणसाला रावाचा रंक कसा बनवतात, सायबर गुन्हेगारीला बळी पडणाऱ्या मोठय़ा कंपन्या, आानलाइन दारू मागवल्यावर आलेली आफत, इंटरनेटवरून फसवणाऱ्या सायबर टोळय़ा, अनोळखी मेल, पाशलेस व्यवहार करताना अनेकदा होणारे तोटे, गरजेपोटी कर्ज काढल्याने होणारे घोटाळे, झूम किंवा आानलाइन मीटिंग सुरू असताना अनोळखी लिंक उघडल्यामुळे येणारी पश्चात्तापाची पाळी, ‘टिंडर’ या जगप्रसिद्ध डेटिंग आपद्वारे केली जाणारी बनवेगिरी, वेबसाईटवर आर्थिक व्यवहार करताना घडणारे संशयास्पद प्रकार, व्हाटस्आप, इन्स्टाग्रामवर अनोळखी लोकांशी बोलण्यातून नंतर मिळणारे हादरे, सोशल मीडियावरील हाकर्स, आानलाइन गेमिंगचे मोहजाल, एटीएम कार्डच्या गैरवापरामुळे झालेले तोटे, करन्सी फ्राड, वेबसाईट फ्राड, फसव्या जाहिराती, धर्मांतराचा ‘खेळ’, हनी टाप, देशातले-विदेशातले वेबसाईटवरील सायबर गुन्हय़ांचे हाटस्पाट, डेबिट कार्ड क्लोनिंग, स्वस्त कालचं राकेट, सोर्स कार्डच्या चोऱ्या, सॉफ्टवेअरची कापी, डेटाविक्रीचे धोके, फोनवरून दिलेल्या खोट्या माहितीवर आंधळेपणाने ठेवलेल्या विश्वासातून होणारी फसवणूक, परीक्षेत हायटेक कापीच्या गैरप्रकारातून खराब होणारे करीअर, सायबर गुन्हेगारांबरोबर माइंड गेम खेळण्याच्या प्रकारातून ओढवणारं संकट, सेक्सटार्शन, सायबर दहशतवाद, सायबर विश्वात वावरताना नडणारा अति आत्मविश्वास यांसारखे या विश्वाचे फायद्याबरोबर होणारे अनेक तोटे नेटके सांगून या लेखकद्वयीने ‘सायबर स्मार्ट व्हा’ या लेखातून सोशल मीडियावर वावरताना काय काळजी घ्यावी याच्या नेमक्या, समर्पक आणि आवश्यक अशा क्रमवार टिप्सही दिल्या आहेत. सोशल मीडियाच्या या जमान्यात हे पुस्तक म्हणजे नागरिकांसाठी मार्गदर्शक दीपस्तंभ ठरेल. नीलेश जाधव यांचं आकर्षक मुखपृष्ठ आणि आतील लेखांना अनुरूप रेखाचित्रे यामुळे पुस्तकाला आलेला उठावदारपणा नजरेत भरण्यासारखा आहे.

सायबर अ‍ॅटॅक – आधुनिक तंत्रज्ञानाच्या मोहक मुखवट्याआडचा भेसूर चेहरा

 लेखक : डॉ. संजय तुंगार, सुधीर साबळे

 संपादन : डॉ. सदानंद बोरसे

 प्रकाशन : राजहंस प्रकाशन

 पृष्ठे : 168  मूल्य : 290 रुपये