>> नीलिमा प्रधान
मेष – प्रकृतीची काळजी घ्या
बुध, शुक्र युती, सूर्य, शुक्र लाभयोग. क्षुल्लक अडचणी, ताणतणाव येतील. अपराधीपणाची भावना न ठेवता युक्तीने, प्रेमाने सर्वांची मने जिंकता येतील. नवीन परिचय, उत्साह, आत्मविश्वास वाढवणारे ठरतील. प्रकृतीची काळजी घ्या. अनाठायी खर्चावर लक्ष ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधकांना कमी लेखू नका. कार्यावर भर द्या.
शुभ दिनांक : 6, 7
वृषभ – नवे कंत्राट मिळवा
सूर्य, गुरू लाभयोग, बुध, शुक्र युती. कठीण प्रश्नावर मार्ग शोधाल. उत्साह, आत्मविश्वास तुम्हाला प्रत्येक दिवस यशस्वी करण्यास मदत करेल. नोकरीत सर्वांची मने जिंकता येतील. धंद्यात वाढ होईल. नवे कंत्राट मिळवा. थकबाकी मिळवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांशी चर्चा होईल. प्रगती, अधिकार लाभतील. कौटुंबिक महत्त्वाचा निर्णय घ्याल.
शुभ दिनांक : 8, 9
मिथुन – कामे मार्गी लागतील
बुध, शुक्र युती, सूर्य, चंद्र लाभयोग. वेळेला महत्त्व दिल्यास अनेक कामे मार्गी लावता येतील. कठोर शब्द त्रासदायक ठरतील. प्रकृतीची काळजी घ्या. नोकरीत प्रभाव वाढेल. मित्र साहाय्य करतील. धंद्यात जम बसेल. कायदा पाळून निर्णय घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जिद्द ठेवा. प्रयत्नांची तयारी ठेवा. रागाच्या भरात निर्णय घेऊ नका.
शुभ दिनांक : 6, 7
कर्क – अहंकार नको
बुध, शुक्र युती. सूर्य, गुरू लाभयोग. कोणतेही कठीण, किचकट न होणारे काम करता येईल. अहंकाराची भावना नको. नोकरीत चांगला बदल होईल. धंद्यात चढाओढ वाढली तरी पुढे राहाल. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील तणाव, गैरसमज दूर करण्याची संधी तोडू नका. प्रतिष्ठा, लोकप्रियतेत भर पडेल अशी घटना घडेल. कौटुंबिक आनंद घ्याल.
शुभ दिनांक : 7, 9
सिंह – कामात चूक टाळा
बुध, शुक्र युति, सूर्य, शनि षडाष्टक योग. थोरामोठय़ांचे सहकार्य मिळवणे कठीण होईल. सहनशीलता, नम्रता यावर यश मिळेल. नोकरीच्या कामात चूक टाळता येईल. मित्र, सहकारी मदत करेल. धंद्यात गोड बोला. कायदा पाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होईल. समाजकार्यावर भर द्या. स्पर्धा कठीण आहे.
शुभ दिनांक : 8, 9
कन्या – फसगत टळेल
सूर्य, चंद्र लाभयोग, शुक्र नेपच्युन षडाष्टक योग. जवळच्या व्यक्ती, मित्र, नातलग यांच्या विचारांना कमी लेखू नका. खाण्यापिण्याची काळजी घ्या. गुप्त कारवायांना ओळखा म्हणजे फसगत टळेल. मोह, लाभ याच्या विचाराने नुकसान होईल. नोकरीत प्रभाव वाढेल. धंद्यात कौशल्य वापरा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नविन परिचय होतील.
शुभ दिनांक : 9, 10
तूळ – सैम्य धोरण ठेवा
बुध, शुक्र युती, सूर्य, चंद्र लाभयोग. मुंगी होऊन साखर खा. अनेक समस्या नम्रता, मधुरवाणी यामुळे सोडवता येतील. रागाचा पारा न वाढवता बोला. प्रवासात घाई नको. नोकरीत वरिष्ठ साहाय्य करतील. दगदग, दुखापत टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कामाचे कौतुक होईल. सौम्य धोरण ठेवा. घरगुती कामे होतील. पद टिकवा.
शुभ दिनांक : 6, 7
वृश्चिक – प्रत्येक दिवस प्रेरणादायी
सूर्य, गुरू लाभयोग, बुध, शुक्र युती. प्रेरणादायक, उत्साहवर्धक, आत्मविश्वास वाढवणारा सप्ताह. तुमच्या क्षेत्रात नवे यश मिळवाल. कल्पनाशक्तीला वाव मिळेल. नविन परिचय फायदेशीर. नोकरीधंद्यात प्रगती होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचे मुद्दे मांडून स्वतचे महत्त्व वाढवा. कठीण कामे होतील. आर्थिक साहाय्य मिळेल.
शुभ दिनांक : 6, 7
धनु – यश खेचावे लागेल
बुध, शुक्र युती, चंद्र, शनि प्रतियुती. क्षेत्र कोणतेही असो स्वत मोठेपणा घेण्यापेक्षा इतरांकडून कामे करून घ्या. चातुर्य, स्नेह वाढवून यश खेचावे लागेल. स्वत कमीपणा घ्या पण यश सोडू नका. नोकरी टिकवा. मेहनत घ्या. धंद्यात अरेरावी नको. चिकाटी ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या कार्याविषयी, आत्मविश्वासाविषयी शंका घेतली जाईल.
शुभ दिनांक : 6, 7
मकर – करारात सावध रहा
सूर्य, गुरू लाभयोग, शुक्र, प्लुटो षडाष्टक योग. फक्त प्रतिष्ठा वापरूनच कामे होतात असे समजू नका. नम्रता, चातुर्य हेच यशाचे गमक ठरते. फसवे आश्वासन घेऊ नका. व्यवहारात, करारात सावध रहा. नोकरीत यश मिळेल. इतरांना दुखवू नका. धंद्यात फसगत टाळा. व्यसन नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चौफेर सावध रहा. प्रतिष्ठा मिळेल.
शुभ दिनांक : 8, 9
कुंभ – दूरदृष्टिकोन ठेवा
बुध, शुक्र युती, सूर्य, शनी षडाष्टक योग. तणाव, चिंता निर्माण होत राहील. मैत्रीच्या नात्यानेच समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. अहंकाराने नुकसान होईल. दूरदृष्टिकोन उपयुक्त ठरेल. नोकरी fिटकवा. कामात सतर्क रहा. धंद्यात वाद नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आरोप, टीका सहन करावी लागेल. अहंकार ठेवल्यास बदनामी होईल.
शुभ दिनांक : 6, 7
मीन – वाद वाढवू नका
सूर्य, गुरू लाभयोग, शुक्र, प्लुटो षडाष्टक योग. जवळच्या व्यक्ती, मित्र, नातलग यांच्याशी मिळतेजुळते धोरण ठेवा. वाद वाढवू नका. गैरसमज होईल. नवीन परिचयावर जास्त विश्वास ठेऊ नका. आकर्षण फसवे ठरेल. नोकरी प्रभाव वाढेल. धंद्यात नुकसान टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कुणाचा अपमान करू नका. सहज धोरण ठेवा. प्रतिष्ठा जपा.
शुभ दिनांक : 7, 12