रशिया-अमेरिकासह सात देशांत कैद्यांची देवाण-घेवाण

अमेरिका-रशिया आणि पाश्चात्य देशांमध्ये कैद्यांची देवाण-घेवाण झाली आहे. तुर्कस्तानची राजधानी अंकारा येथे कैद्यांच्या अदलाबदलीचा हा करार झाला आहे. या करारानुसार अमेरिका, रशिया आणि जर्मनीसह 7 देशांच्या तुरुंगात कैद असलेल्या 26 कैद्यांची यावेळी सुटका करण्यात आली. यातील दोन अल्पवयीन मुलांसह दहा कैद्यांना रशियाला पाठवण्यात आले आहे, तर 13 कैद्यांना जर्मनी आणि तीन कैद्यांना अमेरिकेत पाठवण्यात आले. अमेरिका आणि रशिया यांच्यातील कैद्यांच्या देवाणघेवाणीशी संबंधित गेल्या तीन वर्षांतील हा तिसरा करार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या कराराला आधीच मंजुरी दिली होती. याआधी एप्रिल 2022 आणि डिसेंबर 2022 मध्ये दोन्ही देशांमध्ये कैद्यांची देवाणघेवाण झाली होती. अमेरिकन मीडिया हाऊस वॉल स्ट्रीट जर्नलचे पत्रकार इव्हान गेर्शकोविच यांची रशियाने सुटका केली. इव्हानव्यतिरिक्त आणखी दोन अमेरिकन नागरिकांची रशियातून सुटका करण्यात आली.