जिवंत माणसाला पुरलं, भटक्या कुत्र्यामुळे वाचले प्राण

एका व्यक्तीला जिवंत पुरण्यात आलं होतं. पण भटक्या कुत्र्यांना माती उकरली आणि या माणसांचे प्राण वाचले. उत्तर प्रदेशमध्ये ही घटना घडली होती.

आग्र्यामध्ये किशोर या 24 वर्षीय तरुणाला जमिनीच्या वादातून मारहाण केली. त्यानंतर किशोरचा गळा आवळला. किशोर मेला असे समजून आरोपींनी त्याला जिवंतच पुरलं. त्यानंतर अन्नाच्या शोधात काही भटके कुत्रे हुंगत हुंगत आले. जिथे किशोरला पुरण्यात आलं होतं तिथे कुत्र्यांनी जमीन उकरायला सुरूवात केली. श्वास घेता आल्यामुळे किशोर शुद्धीवर आला आणि खड्ड्यातून बाहेर पडला. बाहेर पडल्यानंतर इतर नागरिकांच्या मदतीने तो रुग्णालयात दाखल झाला. डॉक्टरांनी किशोरवर उपचार केले आणि त्याचे प्राण वाचले.

किशोरच्या आईने दिलेल्या माहितीनुसार चार जण किशोरच्या घरी आले आणि त्याला जबरदस्तीने उचलून घेऊन गेले. जमिनीच्या वादातून आपल्याला मारण्याचा प्रयत्न झाल्याचे किशोरने सांगितले. याप्रकरणी पोलिसांत